Most Catch taker fielders: क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत ‘या’ 5 खेळाडूंनी घेतलेत सर्वाधिक झेल, यादीत भारताचा कर्णधारही सामील .

Most Catch taker fielders: क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतलेत सर्वाधिक झेल, यादीत भारताचा कर्णधारही सामील .

Most Catch taker fielders: क्रिकेट हा एक खेळ आहे ज्यामध्ये प्रत्येक पायरीवर नियमांचे पालन करावे लागते. क्रिकेट हा सर्वात नियमांसह खेळला जाणारा एक खेळ आहे.  क्रिकेट खेळात एकूण 42 प्रकारचे नियम आहेत. जर आपण क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला आऊट करण्याबद्दल बोललो, तर क्रिकेट खेळात फलंदाज अनेक प्रकारे आऊट होऊ शकतो जसे की, रन आऊट, झेलबाद, बोल्ड, एलबीडब्ल्यू आऊट, हिट विकेट इत्यादी.

विश्व चषक गमावल्यानंतर Virat Kohli चा मोठा निर्णय, पुढील काही दिवस विराट खेळणार नाही क्रिकेट...

आणि सर्वसाधारणपणे असे दिसून आले आहे की, बहुतेक फलंदाज झेलबाद होतात. कारण त्याच्यावर संघासाठी धावा काढण्याचे दडपण असते आणि लांब शॉट खेळण्यासाठी तो उंच शॉट खेळतो ज्यामुळे विरोधी संघाचे खेळाडू झेलबाद करण्याची संधी सोडत नाहीत.. तर आज या रिपोर्टमध्ये आपण फक्त अशाच खेळाडूंबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक झेल घेतले आहेत.

Most Catch taker fielders: या खेळाडूंनी घेतले आहेत आतापर्यंत सर्वाधिक झेल.

महेला जयवर्धने: क्रिकेट इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी फलंदाज महेला जयवर्धने पहिल्या क्रमांकावर आहे. महेला जयवर्धनेने 1998 ते 2015 पर्यंत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 448 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे, ज्यामध्ये त्याने 218 झेल घेतले आहेत आणि एका सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा त्याचा विक्रम 4 झेल आहे,जो क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत मोठा विक्रम आहे.

Most Catch taker fielders: क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतलेत सर्वाधिक  झेल, यादीत भारताचा कर्णधारही सामील .
Most Catch taker fielders

रिकी पाँटिंग: या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिकी पॉन्टिंगने 1995 ते 2012 या कालावधीत आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 375 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. ज्यामध्ये त्याने एकूण 160 झेल घेतले आहेत आणि एका सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा त्याचा विक्रम तीन झेलांचा आहे.

मोहम्मद अझरुद्दीन: भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद अझरुद्दीनने 1985 ते 2000 पर्यंत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 334 सामन्यांमध्ये भाग घेतला ज्यामध्ये त्याने 156 झेल घेतले आणि एका सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम 3 आहे.

Most Catch taker fielders: क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतलेत सर्वाधिक झेल, यादीत भारताचा कर्णधारही सामील .

रॉस टेलर: न्यूझीलंडचा खेळाडू रॉस टेलर क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रॉस टेलरने 2006 ते 2022 पर्यंत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 236 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे ज्यामध्ये त्याने 142 झेल घेतले आहेत आणि एका सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा त्याचा विक्रम 4 आहे.

Most Catch taker fielders: क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतलेत सर्वाधिक  झेल, यादीत भारताचा कर्णधारही सामील .

विराट कोहली : भारतीय क्रिकेट संघाचा सुप्रसिद्ध खेळाडू विराट कोहली क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहलीने 2008 ते 2023 पर्यंत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 271 सामन्यांमध्ये भाग घेतला ज्यामध्ये त्याने 141 झेल घेतले आणि विराट कोहलीचा एका सामन्यात सर्वाधिक 3 झेल घेण्याचा विक्रम आहे.


हेही वाचा:

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *