सचिन तेंडुलकर नव्हे तर ‘या’ कांगारू खेळाडूने ठोकली आहेत सलामीला खेळतांना सर्वाधिक शतके, यादीमध्ये 6 दिग्गज खेळाडूंचा समावेश..!

सचिन तेंडुलकर नव्हे तर 'या' कांगारू खेळाडूने ठोकली आहेत सलामीला खेळतांना सर्वाधिक शतके, यादीमध्ये 6 दिग्गज खेळाडूंचा समावेश..!

Most Centuries by opener batsmans:  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघासाठी सलामीवीरची भूमिका महत्त्वाची असते. विशेष करून टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्यावर सर्वाधिक जबाबदारी असते. काही क्रिकेटपटू वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजीस येतात, मात्र तेच खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळताना दिसून येतात. आज आपण अशा खेळाडूंची माहिती पाहणार आहोत, ज्यांनी वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सलामीला येऊन सर्वाधिक शतके ठोकली आहेत. 

या सलामीवीरांनी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकली आहेत सर्वाधि शतके.

1. डेव्हिड वॉर्नर (David Warner)

ऑस्ट्रेलियाचा माजी स्फ़ोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने सलामीला खेळताना सर्वाधिक 49 शतके ठोकली आहेत. डेव्हिड वॉर्नर त्याच्या कारकिर्दीमध्ये कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून सलामीला खेळत होता. आणखीन दोन-तीन वर्ष तो क्रिकेट सहज खेळू शकला असता. मात्र युवा क्रिकेटपटूंना संधी मिळावी, यासाठी त्याने मागील महिन्यात त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

AUS vs NZ: विश्रांतीनंतर ऑस्ट्रोलीयाचे दिग्गज खेळाडू संघात परतले, या कारणामुळे संघात असूनही पॅट कमिन्स सांभाळणार नाही कर्णधारपद..

2. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक भलेही सचिन तेंडुलकर यांनी ठोकले असेल मात्र सलामीला खेळताना सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीमध्ये केवळ 45 शतके ठोकली आहेत. सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मध्ये चौथ्या स्थानावर खेळायला यायचा. वनडे क्रिकेटमध्ये देखील सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चौथ्या पाचव्या स्थानावर खेळत होता. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहत आहे.

IND vs AFG LIVE

3.रोहित शर्मा Rohit Sharma)

भारताचा विद्यमान कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा याने त्याच्या कारकिर्दीमध्ये सलामीला खेळताना 43 शतके ठोकली आहेत. रोहित शर्माची देखील क्रिकेट कारकीर्दही मधल्या फळीतील फलंदाज म्हणून झाली होती. सचिन-सेहवाग यांच्यानंतरच त्याला सलामीचा फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली. रोहित आणखीन तीन-चार वर्ष क्रिकेट सहज खेळू शकतो. तसेच तो जबरदस्त फॉर्मत आहे. त्यामुळे या विक्रमांमध्ये तो आणखीन भर घालू शकतो.

4.क्रिस गेल (Chris Gayle)

सचिन तेंडुलकर नव्हे तर 'या' कांगारू खेळाडूने ठोकली आहेत सलामीला खेळतांना सर्वाधिक शतके, यादीमध्ये 6 दिग्गज खेळाडूंचा समावेश..!

वेस्टइंडीजचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना 42 शतके ठोकल्याची नोंद आहे. सलामीला खेळताना सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजाच्या या यादीमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये एका त्रिशतकाची देखील नोंद आहे.

5.सनथ जयसूर्या (Sanath jayasuriya)

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 41 शतके ठोकल्याची नोंद आहे. भारताविरुद्ध खेळताना त्याने एक त्रिशतक देखील ठोकले होते. भल्या भल्या दिग्गज गोलंदाजाची बोलती बंद करणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने नव्वदीच्या दशकातला काळ गाजवला. 1996 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात सनथ जयसूर्याचा मोलाचा वाटा आहे.

6.मॅथ्यू हेडन  (matthew hayden)

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये सलामीला खेळताना चाळीस शतके ठोकले आहेत. मायदेशात झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना त्याने त्रिशतक ठोकले होते. कसोटी क्रिकेट मधील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा ब्रायन लाराचा 400 धावाचा विक्रम हेडनला मोडण्याची संधी होती. मात्र तो थोडक्यात हुकला. हेडनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *