‘या’ खेळाडूंना शतक ठोकूनही संघाला पहावे लागले पराभवाचे तोंड; वाचा वर्ल्ड कप मधील कोणाचे शतक गेले वाया..

‘या’ खेळाडूंना शतक ठोकूनही संघाला पहावे लागले पराभवाचे तोंड; वाचा वर्ल्ड कप मधील कोणाचे शतक गेले वाया..


रविवारी भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या मधल्या फळीतील फलंदाज डॅरेल मिचल याने शतकी खेळी करत न्यूझीलंडला एक मोठी धावसंख्या उभी करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्याने 130 धावांची सर्वाधिक खेळी करूनही त्याच्या संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. शतक ठोकूनही पराभवाचे तोंड पाहणाऱ्या यादीत त्याचे नाव जोडले गेले आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये हरलेल्या सामन्यात शतक ठोकणारा तो नववा खेळाडू आहे. 

वनडे वर्ल्डकप मध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हर्षल गिब्ज याने दोन शतके ठोकली आहेत. मात्र त्याचे हे दोन्हीही शतके वाया गेले. शतक ठोकलेल्या दोन्ही सामन्यात त्याच्या संघाचा पराभव झाला होता.

केन विल्यम्सन

रिकी पॉंटिंग याने देखील वनडे वर्ल्ड कपमध्ये चमत्कार दाखवला होता. वनडे वर्ल्डकप स्पर्धेमध्ये त्याने ठोकलेली दोन्ही शतके संघाच्या विजयासाठी कामी आली नाहीत.

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याने देखील वनडे विश्वचषक स्पर्धेमध्ये दोनदा शतकी खेळी केली होती. मात्र तरीदेखील त्याच्या संघाचा पराभव झाला होता. शतक ठोकलेल्या सामन्यात संघाला पराभूत होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरीस यानेही त्याच्या कारकिर्दीमध्ये वन डे विश्वचषक स्पर्धेत दोन शतके लगावली आहेत. तरीही न्यूझीलंड संघाचा दारुण पराभव झाला.

शतक ठोकून ही संघाला पराभूत होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये नेदरलँडच्या खेळाडूचे देखील नाव आहे. रियन टेन डोसोचाटे यानेही वनडे वर्ल्ड कप मध्ये दोन शतके ठोकली होती. पण त्याचे हे दोन्ही शतके वाया गेले.

2015 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाबेचा ब्रँडन टेलर यानेही दोनदा शतके खेळी केली होती. तरीही त्याच्या संघाला विजय मिळवता आला नाही. 

असा आहे रोहित शर्माचा डायट प्लान (Rohit Sharma's Diet Plan)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ही त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये वनडे विश्वचषक स्पर्धेत दोन शतके लगावली होती. शतक ठोकूनही भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

इंग्लंडचा सध्याचा कर्णधार जोश बटलर याने एकमेव शतक ठोकले होते. वन डे विश्वचषक स्पर्धेत ठोकलेले हे एकमेव शतक त्याच्या संघासाठी कामी आले नाही.


हेही वाचा: