ही आहे क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी बॅट, बॅटची किंमत ऐकून हैराण व्हाल,हा खेळाडू करायचा तिचा वापर..
भारताचा राष्ट्रीय खेळ जरी क्रिकेट नसला तरी लाखो लोक क्रिकेट चे चाहते आहेत. दिवसेंदिवस क्रिकेट खेळाविषयी चे हे प्रेम वाढताना दिसत आहे. भारतात अनेक गोष्टींचा लिलाव लागतो. जर आपल्याला एखादी वस्तू आवडली तर आपण म्हणेल तेवढी किंमत देऊन आपण ती वस्तू विकत घेत असतो.

अनेक प्रसिद्ध लोक आपल्या वापरलेल्या वस्तू विकण्यासाठी लिलाव लावतात आणि त्या वस्तू मधून लाखो रुपये कमवत असतात. तर मित्रांनो या लेखात आपण अश्या एका बॅट आणि त्याची किंमत या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
मुख्यत्वे आपण ज्या बॅट पाहतो त्या हजारो रुपयांचा असतात. किंवा असू शकतात. परंतु जर का ती बॅट तुमच्या आवडत्या खेळाडू ने वापरली असेल तर तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देऊन ती गोष्ट खरेदी करु शकता. आज आम्ही अश्या एका बॅट बद्दल सांगणार आहे ज्याची विक्री चक्क 83लाख रुपयांना झाली होती त्याच बॅट ची किंमत आता 1 करोड 20 लाख रुपये एवढी सांगितली जात आहे.
ही बॅट महेंद्रसिंह धोनी ने 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये तसेच 2011 मध्ये सामना जिंकल्यावर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सुद्धा मिळाला होत. या बॅट मुळे तसेच धोनीचा या सामन्यात परफॉर्मन्स सुद्धा चांगला होता. तसेच फायनल च्या वेळी शेवटचा बॉल सिक्स मारून भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारी हीच बॅट होती त्यामुळे क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ही बॅट झाली.
त्या बॅट वर reebok चे लेबल लावलेले होते तसेच हे बॅट लंडन येथील एका चैरिटी कार्यक्रमात विकली होती. धोनी च्या त्या बॅट ची खरेदी ही RK ग्लोबल शेयर अँड सिक्योरिटी लिमिटेड या नामी कंपनीने केली. त्या कंपनीने ही बॅट 161295 डॉलर मध्ये विकत घेतली होती.
सरासरी याची किंमत ही भारतीय करन्सी मध्ये 83 लाख रुपये एवढी होती. परंतु आता त्याच बॅट ची किंमत ही 1 कोटी 20 लाख रुपये एवढी झालेली आहे. मिळालेल्या पैशातून धोनी ने साक्षी फाऊंडेशन ला दान गेले.