IPL Records: आयपीएलच्या इतिहासात हा गोलंदाज ठरलाय सर्वात महागडा गोलंदाज; यादीत भारतीय गोलंदाज सर्वाधिक!

IPL Records: आयपीएलच्या इतिहासात हा गोलंदाज ठरलाय सर्वात महागडा गोलंदाज; यादीत भारतीय गोलंदाज सर्वाधिक!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL Records: आयपीएल हा खेळ संपूर्णपणे फलंदाजाचा मानला जातो. इथे गोलंदाजाला विशेष काही करण्यासाठी वाव नाही. कारण संपूर्ण खेळपट्ट्या या क्रिकेट प्रेमींचे मनोरंजन करण्याच्या हेतूने फलंदाजीस अनुकूल बनवल्या जातात. त्यामुळे फलंदाज गोलंदाजाची यथोच धुलाई करताना पाहायला मिळते. आज आपण आयपीएल मध्ये महागड्या खेळाडूंची माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे आयपीएल मधील महागड्या गोलंदाजांच्या या यादीमध्ये 7 गोलंदाज भारतीय असल्याचे दिसून आले.

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

IPL Records: हे आहेत आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडे गोलंदाज.

1.बासील थंम्पी

मध्यमगती वेगवान गोलंदाज बासील थंम्पी हा आयपीएल मधला सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. 2018 मध्ये आरसीबीविरुद्ध खेळताना त्याने चार षटकात तब्बल 70 धावा दिल्या होत्या. त्यावेळी तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत होता.

2. यश दयाल

सर्वांत महागड्या स्पेल यादीमध्ये यश दयाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल याची 2023 मध्ये केकेआर विरुद्ध खेळताना रिंकू सिंगने येथोच धुलाई केली होती. त्याच्या एका षटकात पाच षटकार ठोकून रिंकूने केकेआरला हरत असलेला सामना जिंकून दिला होता. त्या सामन्यात त्याने चार षटकात 69 धावा दिल्या होत्या. आयपीएल मधला तो दुसरा महागडा गोलंदाज ठरला.

३.ईशांत शर्मा

भारताचा कसोटीपटू ईशांत शर्मा 2013 मध्ये सीएसके विरुद्ध खेळताना चार षटकात 66 धावा दिल्या होत्या. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा ईशांत शर्मा आयपीएल मध्ये पूर्णपणे  फेल गेला.IPL Records: आयपीएलच्या इतिहासात हा गोलंदाज ठरलाय सर्वात महागडा गोलंदाज; यादीत भारतीय गोलंदाज सर्वाधिक!

४.मुजीब उर रहमान

अफगाणिस्तानचा स्टार मिस्टरी गोलंदाज ‘मुजीब उर रहमान’ हा 2019 मध्ये हैदराबाद विरुद्ध खेळताना चार षटकात 66 धावा दिल्या होत्या. याने आपल्या गोलंदाजीने साऱ्यांनाच प्रभावित केले होते. सुरुवातीच्या काळात तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत होता.

५.हर्षदीप सिंग

डाव्या हाताने गोलंदाजी करणारा मध्यम गती वेगवान गोलंदाज हर्षदीप सिंग 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना 3.5 षटकात 66 धावा दिल्या होत्या. मागील वर्षी तो सर्वात जास्त गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.

६.उमेश यादव

‘विदर्भ एक्सप्रेस’ या नावाने ओळखला जाणारा उमेश यादव 2013 मध्ये आरसीबी विरुद्ध खेळताना चार षटकात 65 धावा दिल्या होत्या. त्यावेळी तो केकेआर संघाचे प्रतिनिधित्व करत होता. सध्या तो आरसीबीच्या संघाकडून खेळतोय.

७. संदीप शर्मा

IPL Records

आयपीएल स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केलेल्या संदीप शर्मा याने 2014 मध्ये हैदराबाद विरुद्ध खेळताना चार षटकात तब्बल 65 धावा दिल्या होत्या. आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणावी तशी संधी मिळाली नाही आणि जेव्हा मिळाली तेव्हा त्याला त्या संधीचे सोने करता आले नाही.

८.जोश हेजलवूड

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा देखील आयपीएलच्या महागड्या गोलंदाजाच्या यादीमध्ये मोडतो. 2022 मध्ये पंजाब विरुद्ध खेळताना त्याने चार षटकात तब्बल 64 धावा दिल्या होत्या. तो आरसीबीच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो.

IPL Records: आयपीएलच्या इतिहासात हा गोलंदाज ठरलाय सर्वात महागडा गोलंदाज; यादीत भारतीय गोलंदाज सर्वाधिक!

९.सिद्धार्थ कौल

2020 मध्ये सिद्धार्थ कौल याने मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना चार षटकात 64 धावा दिल्याची नोंद आहे. सिद्धार्थ कौल याला देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *