आपल्या भारतात सर्वात जास्त वेड हे क्रिकेट चे आहे. त्यामुळे प्रत्येकालाच कोणता ना कोणता क्रिकेटर हा आवडतच असतो तसेच प्रत्येक फॅन हा आपल्या आवडत्या क्रिकेटर चे अनुकरण करतच असतो. तसेच क्रिकेटर बद्दल अनेक वेगवगळ्या गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असतेच.

बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटर यांची जीवनशैली ही खूपच वेगळी असते. महागडी लाईफ स्टाईल, महागड्या गाड्या, महागडी कपडे यामुळे हे लोक सतत चर्चेचा विषय बनलेली असतात. पैसा आला की लोक आपल्या आवडणाऱ्या वस्तू या घेतातच. आणि आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण करत असतात.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांच्याकडे अत्यंत महागड्या कार आहेत त्याची किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
महेंद्रसिंह धोनी:-
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना वेगवेगळ्या बाईक चालवायचं खूप छंद आहे. याचबरोबर महेंद्र सिंह धोनी यांचे कार कलेक्शन सुद्धा मोठे आहे महेंद्र सिंह धोनी कडे अनेक पुराण्या विंटेज कार सुद्धा आहेत. सध्या धोनी कडे सर्वात महागडी कार Porsche 911 आहे ज्याची किंमत तब्बल 2.5 कोटी रुपये आहे. याशिवाय धोनीकडे 1.40 कोटी रुपयांची फेरारी 5990 जीटी कार सुद्धा आहे. एवढेच नाही तर त्याच्याकडे 70 लाखांची Pontiac firebird tans AM आहे.
सचिन तेंदुलकर :-
भारतीय संघाचे अनुभवी आणि माझी कॅप्टन आणि फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांना ओळखले जाते. सचिन तेंडुलकर हे BMW इंडिया चे ब्रँड ॲम्बेसेडर सुद्धा आहेत. सचिन तेंडुलकर कडे BMW i8 ही कार आहे ज्याची किंमत जवळपास 2.62 कोटी रुपये आहे. सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याच्याकडे BMW M5 कार आहे, या कारचे फक्त 300 युनिट्स बनवण्यात आले होते.
याशिवाय सचिन तेंडुलकर कडे 1.73 कोटी किमतीची BMW 750 Li M Sports, BMW M6 Gran Coupe 1.78 कोटी आणि BMW M5 30 Jahre M5 आहेत.
युवराज सिंह :-
भारतीय संघाचे माजी फलंदाज म्हणून युवराज सिंह ला ओळखले जाते. अतिशय घातक फलंदाज म्हणून युवराज सिंह ला ओळखले जाते. कार बद्दल सांगायचे झाले तर सध्या युवराज सिंह कडे अनेक महागड्या कार आहेत. त्यांची सर्वात खास कार बेंटले फ्लाइंग स्पर आहे, ज्याची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘BMW M3 Convertible’, ‘Audi Q8’ आणि ‘Lamborghini MURCIÉLAGO’ सारख्या कार आहेत.
हार्दिक पांड्या :-
भारतीय संघाचा ऑल राऊंडर खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या ला ओळखले जाते. हार्दिक पांड्या कडे एकापेक्षा जास्त गाड्या आहेत. हार्दिक पांड्याकडे 3.73 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी हुराकन ईव्हीओ कार आहे. याशिवाय त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ AMG G63 SUV आणि रेंज रोव्हर वोग 2.31 कोटींची आहे.