Most Expensive Cricket Bat: ना विराट ना रोहित.. सर्वात महागडी बॅटने खेळतोय ‘हा’ भारतीय खेळाडू ,पहा सर्वच भारतीय खेळाडूंच्या बॅटची किंमत

सर्वात महागडी बॅट

Most Expensive Cricket Bat: ना विराट ना रोहित.. सर्वात महागडी बॅटने खेळतोय ‘हा’ भारतीय खेळाडू ,पहा सर्वच भारतीय खेळाडूंच्या बॅटची किंमत


क्रिकेटमध्ये खेळाडू ज्या बॅटने धावा काढतात त्याला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक खेळाडू फलंदाजीसाठी वेगवेगळ्या कंपनीची बॅट वापरतो. फलंदाज पूर्वीच्या काळी लांब आणि जाडजूड बॅट वापरायचे. आधुनिक काळात या बॅटला खूपच महत्त्वाचे स्थान आले आहे. काही खेळाडू तर दहा-बारा बॅट नेहमीच आपल्या सोबत ठेवत असतात. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. ज्याच्याकडे नेहमीच दहा-बारा बॅट पाहायला मिळायच्या. 

कोणता भारतीय खेळाडू वापरतो सर्वात महागडी बॅट?

क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या या बॅटची किंमतही भरपूर असते. भारतीय क्रिकेटपटू देखील अत्यंत महागड्या कंपनीच्या बॅट वापरतात. आपल्याला असे वाटेल की रोहित शर्मा विराट कोहली यांच्याकडे सर्वात महागड्या बॅट आहेत. पण वास्तविक पाहता रोहित विराट कोहली नव्हे तर असा एक स्फोटक खेळाडू आहे जो की सर्वात महागडी बॅट वापरतो. ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखला जाणारा सूर्या म्हणजेच सूर्यकुमार यादव हा सर्वात महागडी बॅट फलंदाजीसाठी वापरतो.

बॅट

विराट कोहली- रोहित शर्माच्या बॅटची किंमत किती? भारतीय संघाच्या सर्व फलंदाजांच्या बॅटची किंमत. (team India’s cricketers Bat Price)

चेस मास्टर विराट कोहली हा एमआरएफ मास्टर्स एडिशन या कंपनीची बॅट वापरतो. त्याच्या बॅट ची किंमत जवळपास 50 हजार आहे. याच बॅटच्या साहाय्याने त्याने जागतिक क्रिकेटमध्ये आपला बोलबाला तयार केला आहे.

रोहित शर्मा : ‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा इंग्लिश विलो ची बॅट वापरतो. तो सर्वात कमी किमतीशी म्हणजे 45 ते 52 हजार रुपये किमतीची बॅट फलंदाजीसाठी वापरतो.

हिटमॅनने रचला विक्रमांचा पंजा.! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नावावर केले हे 5 मोठे विक्रम..
image courtesy- Rohit sharma/ Twitter

शुभमन गिल: भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल हा देखील इंग्लिश विलो कंपनीची बॅट वापरतो. त्याचीही त्याच्याही बॅटची किंमत साधारणपणे 45 ते 52 हजारच्या घरात आहे.

‘हार्दिक पांड्या’: भारतीय क्रिकेट संघात मधल्या फळीत खेळणारा अष्टपैलू खेळाडू ‘हार्दिक पांड्या’ हा एस जी कंपनीची बॅट वापरतो त्याच्या बॅट ची किंमत 48 ते 50 हजार दरम्यान आहे.

IND vs PAK

श्रेयस अय्यर: स्टायलिश फलंदाज श्रेयस अय्यर हा देखील इंग्लिश विलो या कंपनीची बॅट वापरतो. त्याच्या बॅटची किंमत देखील जेमतेम 45 ते 52 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आठव्यांदा केले चित; पाकिस्तानची पराभवाची मालिका कायम

ईशान किशन: युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन हा देखील हार्दिक पंड्याप्रमाणे एस जी कंपनीची बॅट वापरतो. त्याच्या बॅट ची किंमत 48 ते 50 हजार दरम्यान आहे.

क्रिकेट 360 म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव हा एस एस इंग्लिश या कंपनीची बॅट वापरतो त्याच्या बॅट ची किंमत ही 60 हजार रुपये इतकी आहे. याच बॅटच्या साह्याने सूर्यकुमार यादव ने आपली छाप सोडली आहे. याच बॅटने मारणारा सूर्याचा ‘सुपला शॉट’ फेमस आहे.  सूर्यकुमार यादव हा भारतीय संघामध्ये सर्वाधिक महागडी बॅट वापरणारा खेळाडू आहे ..


हेही वाचा:

शुभमन गिल नंतर आणखी एका भारतीयला झाली डेंग्यूची लागण; पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी आली मोठी धक्कादायक बातमी!

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..