Most fastest Century:सेंचुरी ठोकण्यासाठी 100 पेक्षा कमी चेंडू खेळून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हा खेळाडू आहे टॉपवर..

 

Most fastest Century: वनडे क्रिकेट असू दे अथवा टेस्ट काही खेळाडू आपल्याच शैलीत खेळत असतात. आक्रमकता ही त्यांच्या फलंदाजीचे प्रमुख वैशिष्ट्य असते,हीच आक्रमकता त्या खेळाडूंना एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवते. 90च्या दशकात बॉल टू रन काढण्यावर जास्त भर दिला जायचा. मात्र आज क्रिकेट फास्ट झाले आहे.

कमी चेंडूत सर्वाधिक धाव काढण्यावर फलंदाजाचा भर असतो. क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी सेंचुरी ठोकण्यासाठी 100 पेक्षा कमी चेंडू घेत सर्वाधिक शतके ठोकली आहेत, यामध्ये भारतीय खेळाडू आघाडीवर आहेत. या यादीमध्ये आपण शतक साजरे करण्यासाठी सर्वात चेंडू घेऊन सर्वाधि शतक ठोकणाऱ्या खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.

Most fastest Century

या खेळाडूंनी  सेंचुरी ठोकण्यासाठी 100 पेक्षा कमी चेंडू खेळून सर्वाधिक शतके केलीत. (Most fastest Century)

1.रोहित शर्मा (Rohit Sharma)

असा आहे रोहित शर्माचा डायट प्लान (Rohit Sharma's Diet Plan)

भारताचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नेहमीच आक्रमक शैलीत खेळतो. मोठमोठ्या धावा काढण्यात तो माहिर आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 256 वनडे सामन्यात तब्बल 31 शतके ठोकली आहेत. वन डे क्रिकेटमध्ये तीन-तीन द्विशतक ठोकणाऱ्या या खेळाडूने 21 शतक ठोकण्यासाठी त्याने शंभर पेक्षा कमी चेंडू खेळले आहेत.

2.सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये वनडेत 49 शतके ठोकली आहेत. त्यापैकी 24 शतके ठोकण्यासाठी त्याने शंभर पेक्षा कमी चेंडू खेळले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.

3. एबी डिव्हिलियर्स  (A.B. De Villiers)

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये वनडे 25 शतके ठोकली आहेत. मधल्या फळीत खेळणाऱ्या या खेळाडूने सर्वच 25 शतके ठोकण्यासाठी त्याने शंभर पेक्षा कमी चेंडू खेळले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळा धाक त्याने गोलंदाजांवर तयार केला होता.

विराट कोहली  Most fastest Century

4.विराट कोहली (Virat Kohli)

विराट कोहली याने 286 वनडे सामने खेळले आहेत. या त्याने 48 शतके ठोकली आहेत. त्यापैकी 33 शतके 100 पेक्षा कमी चेंडू ठोकली आहेत. त्याच्या बहारदार कामगिरीमुळे तो वनडे क्रिकेट मधला नवा बादशाह आहे. ऑल टाइम ग्रेट क्रिकेटर म्हणून विराट कोहलीचे नाव घेतले जाते.


हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *