Most Half centuries in IPL: आयपीएल मध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारे हे आहेत जिगरबाज कर्णधार

Most Half centuries in IPL: आयपीएल मध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारे हे आहेत जिगरबाज कर्णधार

Most Half centuries in IPL: आयपीएलने, भारतीय क्रिकेट संघांसोबत जागतिक क्रिकेटला देखील अनेक फलंदाज आणि गोलंदाज दिलेत. लीगमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय संघात प्रवेश करण्यास अनेक खेळाडू तयार होतात. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) ला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होत आहे.

या हंगामातला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या 16 हंगामात संघाला विजेतेपद मिळवून देण्यामध्ये कर्णधाराचा सर्वात महत्त्वपूर्ण रोल असतो. आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकलेल्या पाच कर्णधाराच्या कामगिरी वरती नजर टाकणार आहोत. या यादीत काही दिग्गज खेळाडूंची देखील नावे आहेत.

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

Most Half centuries in IPL:  आयपीएलमध्ये या खेळाडूंनी ठोकली आहेत सर्वाधिक अर्धशतके..

१.विराट कोहली (Virat Kohli)

विराट कोहली गेल्या अनेक वर्षापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या कर्णधाराची धुरा सांभाळत आहे. पण त्याच्या संघाला एकही ट्रॉफी जिंकून देण्यात त्याला यश आले नाही. असे असले तरी प्रत्येक हंगामात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून खेळतांना 42 अर्धशतके ठोकली आहेत. कोहलीचा फॉर्म आणि फिटनेस जबरदस्त आहे. त्यामध्ये सातत्य राहिल्यास या विक्रमात आणखीन भर पडू शकते.

Most Half centuries in IPL: आयपीएल मध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारे हे आहेत जिगरबाज कर्णधार

२. डेव्हिड वॉर्नर  (Devid Warner)

ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांनी आयपीएलमध्ये अनेक संघाकडून खेळला आहे. यंदाच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाकडून खेळणार आहे. मागील वर्षी तो सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाकडून खेळत होता. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळतांना त्याच्या बॅटमधून 38 अर्धशतके लगावली गेली आहेत. कर्णधार म्हणून खेळताना सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.

३.गौतम गंभीर (Goutam Gambhir)

Most Half centuries in IPL: आयपीएल मध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारे हे आहेत जिगरबाज कर्णधार

 

केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीर हा अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्याच नेतृत्वाखाली केकेआरच्या संघाने दोनदा आयपीएलचा किताब जिंकला होता. कर्णधार म्हणून खेळताना त्याने 31 सामन्यात अर्धशतके लगावली आहेत. गौतमने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून क्रिकेटनंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. तसेच काही काळ तो समालोचकाच्या भूमिकेत देखील दिसून आला होता. सध्या आयपीएलध्ये तो केकेआरसोबत मुख्य भूमिकेत आहे.

४.रोहित शर्मा (Rohit Sharma)

हिटमॅन रोहित शर्माने त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद दिला आहे. मुंबई इंडियंस (MI)  संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळताना त्याने त्याच्या संघाला पाच वेळा आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे. आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून खेळतांना त्याने 25 अर्धशतके ठोकली आहेत. यंदा मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाचे धुरा हार्दिक पांड्या सांभाळत आहे. रोहित शर्मा आणखीन दोन-तीन वर्ष क्रिकेट सहज खेळू शकतो त्यामुळे या विक्रमात अधिक भर पडू शकते.

एम एस धोनीच्या निवृत्तीनंतर रोहित बनणार सीएसकेचा नवा सेनापती? माजी खेळाडूंनी दिले मोठे संकेत.

५. महेंद्रसिंग धोनी  (MS Dhoni)

आयपीएलच्या इतिहासात कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी सर्वात चतुर कर्णधार मानला जातो. चेन्नई सुपर किंग्संस (CSK) ला त्याने पाच वेळा चषक जिंकून दिला आहे. 2008 पासून तो या संघाचे नेतृत्व करतोय. चेन्नई सुपर किंग्स संघात मधल्या फळीत खेळणाऱ्या धोनीने त्याच्या संघासाठी 21 अर्धशतके ठोकली आहेत. धोनीचे आयपीएलचे हे शेवटचे वर्ष असल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या हंगामात देखील आयपीएलचे  चषक उंचावून तो क्रिकेटला रामराम ठोकू शकतो.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *