लक्षाचा पाठलाग करताना सर्वाधिक अर्धशतक ठोकण्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांचा बोलबाला.. आतापर्यंत या 6फलंदाजांनी ठोकलेत सर्वाधिक अर्ध शतके.
भारतीय क्रिकेटपटूंनी जागतिक क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक विक्रम केले आहेत. रोज नवनव्या विक्रमांची भर पडत आहे. यंदाच्या विश्वचषकात देखील विक्रमांचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने नवा विक्रम केला आहे. धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक हाफ सेंचुरी ठोकण्यामध्ये तो पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक हाफ सेंचुरी ठोकण्यामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला ठरला आहे. आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कोणत्या खेळाडूंनी लक्षाचा पाठलाग करतांना सर्वाधिक अर्धशतके ठोकली आहेत याबद्दल माहिती देणार आहोत, चला तर मग सुरवात करूया आजच्या आय लेखाला.
लक्षाचा पाठलाग करतांना या खेळाडूंनी ठोकलीत सर्वाधिक अर्धशतके.
विराट कोहली: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीमध्ये सर्वांत वर आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत 46 वेळा धावांचा पाठलाग करताना अर्धशतक ठोकले आहे. धावांचा पाठलाग करताना हाफ सेंचुरी ठोकण्यामध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहली आणखीन चार-पाच वर्ष तरी खेळू शकतो. त्यामुळे त्याच्या या आकड्यांमध्ये आणखी कमालीची वाढ दिसू शकते.
कोहली साठी यंदाचे वर्ष फारच लकी ठरल्याचे दिसून येते.
सचिन तेंडुलकर: क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 45 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. सचिन या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. सध्या तो निवृत्त झाला आहे. सचिनचा हा विक्रम नुकताच विराट कोहलीने तोडला आहे.

रोहित शर्मा: भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने 38 वेळा धावांचा पाठलाग करताना अर्धशतक ठोकला आहे. या विक्रमाच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. तो आणखीन चार-पाच वर्ष सहज क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे तो सचिन तेंडुलकरला या विक्रमाच्या बाबतीत पाठीमागे टाकून नवा विक्रम करू शकतो.
रिकी पॉटिंग: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टायलिश फलंदाज रिकी पॉटिंग या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने धावांचा पाठलाग करत असताना 37 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. पॉंटिंगच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने दोन वेळा विश्वचषक जिंकला होता. सध्या तो निवृत्त झाला आहे.
जॅक कॅलीस: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलीस हा या यादीत रिकी पॉंटिंग सह अनुक्रमे चौथ्या स्थानी आहे. त्याने देखील 37 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.
ॲडम गिलख्रिष्ट: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिष्ट याने 33 वेळा अर्धशतकी खेळी साकारली आहे.
सौरव गांगुली: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी 31 वेळा अर्धशतकी खेळी साकारली आहे.
डेसमेंड हेन्स: वेस्टइंडीज चा महान फलंदाज डेसमेंड हेन्स यांनी 30 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. त्यांचा हा विक्रम कित्येक वर्ष अबाधित होता मात्र सचिन तेंडुलकरने पहिल्यांदा तो मोडीत काढला.
तर मित्रांनो, हे होते ते फलंदाज ज्यानी लक्षाचा पाठलाग करतांना आतापर्यंत सर्वाधिक अर्धशतके ठोकली आहेत. निच्छितच विराट कोहलीमात्र या यादीमध्ये आणखी आकडे जमा करू शकतो आणि येणाऱ्या खेळाडूंसाठी अशक्य होईल असा विक्रम आपल्या नावे जमा करू शकतो.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..