Cricket Records: या 7 खेळाडूंनी एकदिवशीय सामन्यात सर्वाधिक वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावा काढल्यात..

 Cricket Records:  बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यांमध्ये डेव्हिड वॉर्नरने धडाकेबाज खेळी केली.  त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर विजय मिळवला. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरने अवघ्या 124 चेंडूत 163 धावांची विस्फोटक खेळी केली. त्यात 14 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश आहे. यासह वन डे क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त धावा 7 वेळा काढण्याचा विक्रम केला आहे.

Cricket Records:   एकदिवशीय सामन्यात सर्वाधिक वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावा काढणारे खेळाडू .

वर्ल्ड कप 2023 : इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर कर्णधार रोहीत शर्मा, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित मोडू शकतो हा मोठा विक्रम..

रोहित शर्मा: वनडे क्रिकेटमध्ये दीडशेपेक्षा जास्त धावा काढण्याऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आठ वेळा दीडशेपेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह त्याने वनडे क्रिकेटमध्ये तीन वेळा डबल सेंचुरी ठोकली आहे, अशी कामगिरी करणारा जगातला एकमेव खेळाडू आहे.

 ख्रिस गेल : दीडशे किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा गाठणाऱ्या खेळाडूंमध्ये ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने पाच वेळा दीडशे किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. 2019 साली झालेल्या विश्वचषकात झिम्बाबे विरुद्ध खेळताना गेलने डबल सेंचुरी ठोकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chris Gayle 👑 (@chrisgayle333)

विराट कोहली: ‘चेस’ मास्टर विराट कोहली याने दीडशे किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढण्याचा विक्रम पाच वेळा केला आहे. नुकतेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

 सचिन तेंडुलकर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये पाच वेळा दीडशे किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये डबल सेंचुरी ठोकणारा तो पहिला खेळाडू आहे. टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो टॉपवर आहे.विश्वचषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडूलकरचाच बोलबाला,पहा यादी.

हाशिम अमला: दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीचा फलंदाज हाशिम अमला याने वनडे क्रिकेटमध्ये चार वेळा दीडशेपेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा तो एकमेव खेळाडू आहे.

सनथ जयसूर्या: आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये गोलंदाजावर एक धाक निर्माण करणारा श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज सनथ जयसूर्या याने चार वेळा दीडशे पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये दीडशेपेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे.

 Cricket Records: या 7 खेळाडूंनी एकदिवशीय सामन्यात सर्वाधिक वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावा काढल्यात..

वन डे क्रिकेटमध्ये सध्या रोहित शर्मा विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर हेच ऍक्टिव्ह खेळाडू आहेत. ते सोडून  वरीलपैकी एकही खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाही. डेव्हिड वॉर्नर ने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. तसेच या विश्वचषक स्पर्धेनंतर तो निवृत्त होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आणखीन काही वर्ष क्रिकेटमध्ये खेळू शकतात. त्यामुळे या विक्रमात आणखीन भर पडू शकते.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *