भारतीय क्रिकेट संघात कोणत्या खेळाडूला सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच मिळाले, जाणून घ्या विराट कोहली कितव्या स्थानी आहे.

0
7

 

भारतीय क्रिकेट संघ हा जगातील उच्च दर्जाचा क्रिकेट संघ म्हणून ओळखला जातो. कारण भारतातील क्रिकेटर खेळाडूंना जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते शिवाय भारतीय क्रिकेटर हे जगभरात अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. क्रिकेट मध्ये प्रत्येक फलंदाजाला आपले कौशल्य आणि दमदार फलंदाजी करण्याची इच्छा असते आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब जिकण्याची इच्छा असते तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या भारतीय फलंदाजांबद्दल सांगणार आहे ज्यांनी सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच जिंकले आहेत.

 

मॅन ऑफ द मॅच म्हणजे काय:-

मॅन ऑफ द मॅच हा एक क्रिकेटमध्ये दिला जाणारा पुरस्कार किंवा सन्मान आहे हा सन्मान विशिष्ठ खेळाडू ला दिला जातो. सामन्यात ज्या खेळाडूने खेळामध्ये जबरदस्त फलंदाजी किंवा गोलंदाजी केली असेल अश्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच चा सन्मान दिला जातो.

images 23

 

सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकलेले भारतीय खेळाडू:-

 

सचिन तेंडुलकर:-

मास्टर ब्लास्टर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर से आतापर्यंत सर्वधिक मॅन ऑफ मॅच चा पुरस्कार जिंकला आहे. सचिन तेंडुलकर ने एकूण 76 वेळा मॅन ऑफ मॅच चा पुरस्कार मिळवला आहे. सचिन तेंडुलकर ने एकूण 664 कसोटी सामन्यांमध्ये 14 वेळा आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 62 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकला आहे.

 

 

हे ही वाचा:-आयपीएल टाईम टेबल: नवीन आयपीएल गामाला सुरुवात कधी होणार, किती संघाचा आयपीएल मध्ये समावेश, जाणून घ्या सविस्तर.

 

 

 

Untitled design 15

 

 विराट कोहली:-

भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून विराट कोहली ला जगभरात ओळखले जाते. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात आक्रमण फलंदाज आहे. विराट कोहली ने आतापर्यंत 63 सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकला आहे. विराट कोहली ने कसोटी सामन्यात 10 वेळा, तसेच एकदिवसीय सामन्यात 39 वेळा आणि T20 मध्ये 15 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आहे.

 

रोहित शर्मा:-

रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ठ फलंदाज आहे. आतापर्यंत रोहित शर्मा ने 52 कसोटी, 260 एकदिवसीय आणि 148 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यातून 38 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकला आहे. रोहित शर्माने कसोटी सामन्यात 4 वेळा, एकदिवसीय सामन्यात 22 वेळा आणि T20 सामन्यात 12 वेळा वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आहे.

 

 

हे ही वाचा:- महाराष्ट्राच्या पोरानं जगात नाव काढलं; कोल्हापूर च्या वाघान ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून दिलं!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here