आयसीसीच्या स्पर्धेमध्ये या 7 खेळाडूंनी जिंकलाय सर्वाधिक वेळा ‘सामनावीर’ पुरस्कार, यादीमध्ये दिग्गज भारतीय खेळाडूचाही समावेश..

आयसीसीच्या स्पर्धेमध्ये या 7 खेळाडूंनी जिंकलाय सर्वाधिक वेळा 'सामनावीर' पुरस्कार, यादीमध्ये दिग्गज भारतीय खेळाडूचाही समावेश..

सामनावीर: आयसीसी द्वारा आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. प्रत्येक स्पर्धेत कोणता तरी भारतीय खेळाडू हा आपला खेळ दाखवून हिट होऊन जातो. त्याबद्दल त्याला सामन्यावरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील येते. आयसीसी ने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीरचा किताब पटकावणारे खेळाडूंमध्ये सर्वाधिक भारतीय खेळाडू आहेत.

आयसीसी स्पर्धेमध्ये या 7 खेळाडूंनी सर्वांत जास्त वेळा जिंकलाय सामनावीर पुरस्कार..

क्रिस गेल: वेस्टइंडीजचा महान दिग्गज फलंदाज क्रिस गेल याने आयसीसीच्या स्पर्धेत धमकदार कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्याला 11 वेळा सामनावीरचा किताब देऊन गौरवण्यात आले. सर्वाधिक वेळा सामनावीरचा किताब पटकावणाऱ्या खेळाडूच्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chris Gayle 👑 (@chrisgayle333)

विराट कोहली : चेसमास्टर विराट कोहली याने आयसीसीच्या स्पर्धेत सर्वाधिक 11 वेळा सामनावीरचा किताब पटकवला आहे. सर्वाधिक वेळा सामनावीरचा किताब पटकावणाऱ्या खेळाडूच्या यादीमध्ये तो गेल सोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.

IND vs NZ: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडूलकरचा विक्रम, ठरला विश्वचषकात सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू..

सचिन तेंडुलकर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने देखील आयसीसीच्या स्पर्धेमध्ये जलवा दाखवला आहे. त्याबद्दल त्याला 10 वेळा सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. सर्वाधिक वेळा सामनावीरचा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.

 महेला जयवर्धने: श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाज महेला जयवर्धने हा देखील सचिन नंतर चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने देखील आयसीसीच्या स्पर्धेत दहा वेळा सामनावीरचा पुरस्कार पटकावला आहे. 

आयसीसीच्या स्पर्धेमध्ये या 7 खेळाडूंनी जिंकलाय सर्वाधिक वेळा 'सामनावीर' पुरस्कार, यादीमध्ये दिग्गज भारतीय खेळाडूचाही समावेश..

शेन वॉटसन: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याची कारकिर्द छोटी राहिली, पण छाप टाकणारी राहिली. त्याने आयसीसीच्या 10 स्पर्धेमध्ये सामनावीरचा किताब पटकावला आहे.

रोहित शर्मा : भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांनी दहा वेळा सामनावीरचा किताब पटकावला आहे. सर्वाधिक वेळा सामनावीरचा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोहित सहाव्या स्थानावर असला तरी तो ऍक्टिव्ह खेळाडू आहे. अजून दोन-चार वर्षातच सहज क्रिकेट खेळू शकतो त्यामुळे या विक्रमात आणखीन देखील भर पडू शकते.

IND vs NZ live: पहिल्या सेमिफायनलमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, ख्रिस गेल ला मागे सोडत केली अशी कामगिरी..

सनथ जयसूर्या: श्रीलंकेचा माजी डावखुरा फलंदाज सनथ जयसूर्या याने आयसीसी स्पर्धेत 9 सामन्यात सामनावीरचा पुरस्कार पटकावला आहे.

 युवराज सिंग: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा माझी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स यांनी प्रत्येकी नऊ वेळा सामनावीरचा किताब मिळवला आहे. यात युवीने दोनदा मालिका पुरस्कार देखील पटकावला आहे. (Cricketer Who Won Most Man of the match Award In Icc Cricket Event)


हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *