विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच : एखाद्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. क्रिकेटमध्ये 1975 सालापासून ‘मॅन ऑफ द मॅच’ चा किताब देण्यास सुरुवात झाली. विश्वचषक स्पर्धेमध्येही हा पुरस्कार देण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त कोणत्या खेळाडूंनी ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार पटकावला याची माहिती पुढील प्रमाणे: (World Cup Records)
या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक वेळा ‘ मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावलाय. (Most Man of the Match winner in world cup history)
मार्क वॉ: ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज ‘ मार्क वॉ’ याने विश्वचषक स्पर्धेत एकूण पाच वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावला आहे. मार्क ने पहिल्यांदा 1992 साली विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण चार विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यात त्याने 22 सामन्यात 1004 धावा काढल्या होत्या. 1999 साली विश्वचषक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विजयी संघाचा तो सदस्य आहे.
ग्रॅहम गूच: इंग्लंडचा माजी खेळाडू ग्रॅहम गूच हे पहिल्यांदा 1987 साली विश्वचषकात भाग घेतले होते. त्यांच्यावर तीन वर्षाची बंदी घालण्यात आल्याने त्यांना पहिले दोन विश्वचषक खेळता आले नाही. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विश्वचषकाच्या 21 सामन्यात एक शतक आणि आठ अर्धशतकसह 897 धावा काढल्या आहेत. या सोबतच पाच वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावला आहे.

लान्स क्लूजनर : डाव्या हाताने फलंदाजी करणारा आणि उजव्या हाताने मध्यम गती गोलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज लान्स क्लूजनर याने त्याच्या कारकिर्दीत केवळ दोनच विश्वचषक खेळला होता. 1999 आणि 2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने एकूण 14 सामने खेळला असून त्यात अकरा वेळा नाबाद राहत 372 धावा काढल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबतच त्याने गोलंदाजी मध्ये 22 विकेट देखील घेतले होते. कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल स्वतःच्या संघाच्या बाजूने लावण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये होती. त्याने देखील पाच वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावला होता.
Ind vs Pak 8-0: विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात या भारतीय खेळाडूंनी पटकावलाय ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार.
ग्लेन मॅकग्राथ: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ याने त्याच्या कारकिर्दीत चार विश्वचषक स्पर्धा खेळला आहे. 1996, 1999, 2003 व 2007 या स्पर्धेमध्ये तो सहभाग नोंदवला होता. विश्वचषक स्पर्धेत एकूण त्याने 39 सामने खेळला असून त्यात त्याने ७२ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. नमीबियाविरुद्ध त्याने 15 देत सात गडी बाद करत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या या सर्वोत्तम कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने त्याच्या कारकिर्दीत 1999, 2003 व 2007 विश्वचषक जिंकला. सध्या तो क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

सचिन तेंडुलकर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकीर्दीत एकूण सहा विश्वचषक स्पर्धा खेळला होत्या. या सहा विश्वचषक स्पर्धेत त्याने 45 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर त्यात त्यांनी नऊ वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावलाय. सहा शतके आणि पंधरा अर्धशतके ठोकत 2278 धावा देखील काढल्या. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावण्यामध्ये सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..