मॅन ऑफ द मॅच: क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूला शेवटी ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब देऊन सन्मानित करण्यात येते. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच खेळाडू सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवतात, हे आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे. पण हा किताब पटकवण्यामध्ये अनुभवी खेळाडू देखील तरुण खेळाडूंना मागे टाकलेले दिसून येत आहेत. भारतीय क्रिकेट संघात असे काही आजी-माजी खेळाडू आहेत ज्यांनी वयाच्या तिशीनंतर सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आहे.
रोहित शर्मा : वयाच्या तिशीनंतर सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा तडफदार खेळाडू हिटमॅन रोहित शर्मा हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या वयाच्या तिशीनंतर 15 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे. पूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.
IND vs BAN: “बांग्लादेशने भारतला हरवल्यास मी चक्क…” पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशी खेळाडूंना मोठी ऑफर, भारताला हरवा आणि माझ्यासोबत..
सचिन तेंडुलकर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वयाची तिशी ओलांडल्यानंतर 14 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये देखील तो टॉपवर आहे.
मोहम्मद अझरुद्दीन: स्टायलिश फलंदाज व माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने वयाच्या तिशीनंतर बहारदार खेळीचे प्रदर्शन घडवले. त्यामुळे त्याला 11 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे मोहम्मद अझरुद्दीन वर आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. असे झाले नसते तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यामध्ये तो अव्वल राहिला असता.
विराट कोहली : ऍक्टिव्ह खेळाडू म्हणजेच विराट कोहली याला त्याच्या कारकीर्दीत वयाच्या तिशीनंतर 9 सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवण्यात यश आले. भारतीय खेळाडूंच्या या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. आणखीन तीन-चार वर्षाच्यानंतर विराट कोहली या यादी टॉप वर आलेला पाहायला मिळेल.
वीरेंद्र सेहवाग: स्फोटक फलंदाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने वयाच्या तिशीनंतर एकापेक्षा एक अशा सरस खेळी केल्या होत्या. त्याबद्दल त्याला नऊ वेळा मॅन ऑफ द मॅच चा किताब मिळाला. वयाच्या तिशी नंतर सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे.
वयाच्या तिशीनंतर सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोनच खेळाडू सध्या ॲक्टिव्ह आहेत. इतर सर्व खेळाडू हे क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. हे दोघेही आणखीन तीन-चार वर्ष क्रिकेट सहज खेळू शकतात. त्यामुळे या विक्रमामध्ये आणखीन भर पडू शकते.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी