ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
IPL Records: आयपीएल 2024 सुरु होण्यासाठी आता फक्त एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. याआधी चाहते आता मोठ्या प्रमाणावर आयपीएलबद्दल माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात अनेक विक्रम होतात आणि अनेक विक्रम हे मोडलेही जातात. आज आम्ही तुम्हाला या विशेष लेखामध्ये आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा नॉट आउट राहिलेल्या फलंदाजांविषयी माहिती देणार आहोत. महत्वाचे म्हणजे या यादीमध्ये सर्वांत जास्त हे भारतीय खेळाडू आहेत. चला तर मग सुरवात करूया या विशेष लेखाला..
IPL Records: आयपीएलच्या इतिहासात हे खेळाडू राहिलेत सर्वाधिक वेळा नाबाद..
1.महेंद्रसिंग धोनी
जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम फिनिशर मानला जाणारा सीएसके संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल मध्ये सर्वाधिक 87 वेळा नाबाद राहिला आहे. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. यंदाचे आयपीएल हे त्याचे शेवटचे आयपीएल वर्ष असू शकते.
२.रवींद्र जडेजा
आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा नाबाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा अष्टपैलू खेळाडू ‘रवींद्र जडेजा’ हा दुसऱ्या स्थानावर आहे. जडेजा 71 वेळा नाबाद राहिला आहे. मधल्या फळीतील या फलंदाजाने सीएसकेला महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये धावा काढून विजय मिळवून दिला आहे. जडेजा हा धोनीच्या निवृत्तीनंतर सीएसके चा कर्णधार होऊ शकतो.
३. कायरन पोलार्ड
एकेकाळी मुंबई इंडियन संघाचा प्रमुख आधारस्तंभ राहिलेला मधल्या फळीतील फलंदाज कायरन पोलार्ड हा 52 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मोठ मोठे षटकार ठोकण्यात माहीर असलेला पोलार्ड सध्या मुंबई इंडियन संघाच्या सपोर्ट स्टाफ मध्ये काम करतोय.
View this post on Instagram
४.दिनेश कार्तिक
आयपीएल मधला सर्वोत्तम फिनिशर मानला जाणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यंदा आरसीबीकडून खेळतोय. हे त्याचे शेवटचे आयपीएल वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्रजी मधून समालोचन करणारा कार्तिक आयपीएलमध्ये 46 वेळा नाबाद राहिला आहे. महेंद्रसिंग धोनीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली कारकीर्द लांबवता आली नाही. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीपेक्षा अधी दिनेश कार्तिकने पदार्पण केले होते.
५.डॅवेन ब्रावो
वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू ‘डॅवेन ब्रावो’ याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारले आहे. आयपीएल मध्ये त्याने सीएसके आणि मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो आयपीएल मध्ये 44 वेळा नाबाद राहिला आहे. सध्या तो सीएसके चा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय.
६.युसूफ पठाण
भारताचा धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाण हा 44 सामन्यात नाबाद माघारी परतला आहे. युसुफ पठाणला नुकतेच तृणमूल काँग्रेसने गुजरात मधील बडोदा या ठिकाणहुन लोकसभेचे तिकीट दिले आहे. युसुफ पठाने आयपीएल मध्ये केकेआर आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
७. एबी डिव्हिलियर्स
आयपीएल मध्ये वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा 40 वेळा नाबाद माघारी परतला आहे. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. एबी ने आतापर्यंत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएल मध्ये खेळले होते.
८.डेव्हिड मिलर
मधल्या फळीतील स्टार फलंदाज डेव्हिड मिलर हा देखील 40 वेळा नाबाद राहिला आहे. मिलर आयपीएल मध्ये किंग्स इलेव्हन संघाकडून खेळतोय.
View this post on Instagram
९.हार्दिक पांड्या
मुंबई इंडियन संघाचा विद्यमान कर्णधार हार्दिक पांड्या हा 39 सामन्यात नाबाद परतला आहे. 2022 मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलचा चषक जिंकला होता. यंदा तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय.
१०. हरभजन सिंग
भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आयपीएल मध्ये 37 वेळा नाबाद राहिला होता. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 2000 साली ही हॅट्रिक घेतली होती.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
- या 7 दिग्गज वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये खेळलेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, यादीमधील दुसरे नाव सर्वांत आच्छर्यकारक..!
- IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!