यंदा आयपीएल मध्ये किंग कोहली आपल्या नावी करणार IPL मधील सर्वात मोठा रेकॉर्ड, हा रेकॉर्ड बनवणारा IPL मधील पहिलाच फलंदाज.
आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळ जास्त आवडतो. आपल्या देशात अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात. या मध्ये कब्बडी, खोखो, कुस्ती असे अनेक खेळ खेळले जातात परंतु आपल्याकडील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट खेळ जास्त प्रिय आहे. तसेच आता उद्यापासून आयपीएल च्या 16 व्या सिझन ला सुरुवात होणार आहे त्यामुळे तरुण पिढी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला विराट कोहली कोणता विक्रम करणार आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे स्टार आणि तुफानी फलंदाज विराट कोहली यांचा संघाचा कर्णधार असताना चांगला परफॉर्मन्स राहिला नाही. परंतु विराट कोहली ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी मोठ्या प्रमाणात धावा काढल्या आहेत. या दरम्यान अनेक रेकॉर्ड विराट कोहली ने आपल्या नावी केली आहेत.

विराट कोहली च्या आयपीएल करियर बद्दल सांगायचे झाले तर आतापर्यंत विराट कोहली ने 223 सामन्यांमध्ये 6624 धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. परंतु या सिझन मध्ये जर का विराट कोहली 376 धावांचा टप्पा पार केला तर आयपीएल मध्ये 7000 धावा करणारा एकमेव फलंदाज म्हणून विराट कोहली चे नाव झळकेल. तसेच 7000 धावा पूर्ण करणारा प्रथम खेळाडू विराट कोहली ठरेल.
विराट कोहली चा सध्याचा फॉर्म पाहता असे वाटते की विराट कोहली या सिझन मध्ये 376 धावांचा टप्पा अगदी सहजपणे पार करू शकेल. आयपीएलच्या एकूण 223 सामन्यांमध्ये विराट कोहलीने 5 शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच आयपीएल मध्ये विराट कोहली चा उच्च स्कोर हा 113 धावांचा आहे.