भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2013 साली निवृत्त झाला. सचिनला निवृत्त होऊन दहा वर्षे झाली तरी, त्याचे काही विक्रम आजही अबाधित आहेत. असाच एक दुर्मिळ विक्रम आहे ज्यात सचिनचाच बोलबाला दिसत आहे. सध्या भारतात 2023 विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. काही खेळाडू त्यांच्या आवडत्या संघाविरुद्ध खेळत असताना नेहमीच दमदार कामगिरी करत असतात. आज आपण अशा खेळाडूंची माहिती घेणार आहोत जे विश्वचषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा काढल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धेमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू
View this post on Instagram
एबी डिव्हिलियर्स: विश्वचषक स्पर्धेत एकाच संघाविरोध सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा पहिल्या स्थानावर आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना 415 धावा काढल्या आहेत. वेस्टइंडीज संघाविरुद्ध खेळताना त्याची बॅट तळपायची.
सचिन तेंडुलकर: भल्या भल्या दिग्गज गोलंदाजाशी बोलती बंद करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये धावांचा रतीब घातला होता. विश्वचषक स्पर्धेत त्याने केनियाविरुद्ध खेळताना 355 धावा कुटल्या होत्या.
यासोबतच सचिनने श्रीलंकेविरुद्ध खेळताना 319 धावा काढल्या होत्या. पाकिस्तान संघाविरुद्ध खेळताना त्याच्या नावावर 313 धावांची नोंद आहे. विश्वचषक स्पर्धेत सचिनने त्याच्या कारकिर्दीत तीन संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढल्या आहेत.
कुमार संघकारा: श्रीलंकेचा विकेटकीपर कुमार संघकारा न्यूझीलंड विरुद्ध खेळताना 304 धावा केले आहेत. एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीमध्ये तो सहाव्या स्थानावर आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेत सलग चार सामन्यात चार शतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.
रिकी पॉंटिंग: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने भारताविरुद्ध खेळताना 303 धावा केले आहेत. वर्ल्ड चॅम्पियन संघाच्या या कर्णधाराने 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध लक्षवेधी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले होते.
एडम गिलख्रिस्ट: श्रीलंकेत विरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा माजी दिगग्ज खेळाडू विकेटकीपर एडम गिलख्रिस्ट याने 310 वा केल्या होत्या तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हर्षल गिब्ज याने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 294 धावां काढल्या होत्या. श्रीलंकेचा कुमार संघाकारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 290 धावां काढल्याची नोंद आहे. कुमारने दोन देशांविरुद्ध सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे. सचिन नंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू आहे.
वरील यादीप्रमाणे विक्रम केलेल्या सर्वच खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली असून निवृत्तीनंतर ते प्रशिक्षकाच्या अथवा समालोचकाच्या भूमिकेत आहे सचिन ने मात्र घरच्या परिवारासाठी वेळ देण्याचे ठरवले असल्यामुळे तो कुठल्याच भूमिकेत दिसून येत नाही.
- हेही वाचा:विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी