T20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे हे 3 कर्णधार. जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी.
आपल्या देशात क्रिकेट चे वेड हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रीय खेळापेक्षा क्रिकेट ची क्रेझ जास्त आहे हे आपल्याला माहीत आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेच ची भुरळ आहे. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या 3 कर्णधार बद्दल सांगणार आहे ज्यांनी एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

T20 क्रिकेट सामने लोकांना पाहायला मोठ्या प्रमाणात आवडतात. कारण T20 सामन्यात आपल्याला आक्रमक फलंदाजी तसेच गोलंदाजी पाहायला मोठ्या प्रमाणात मिळते. T20 क्रिकेट मधे फलंदाज अतिशय आक्रमक पने खेळात असतात त्यामुळं लोकांना T20 सामने पाहायला जास्त आवडत.
आरोन फिंच:-
या यादीत अव्वल स्थानी आरोन फिंच या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा समावेश आहे. फिंच ने 2018 साली हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेल्या T20 सामन्यात धडाकेबाज खेळी खेळली होती. या सामन्यात त्याने 70 चेंडूत 16 चौकार आणि 10 षटकार मारून 172 धावा बनवण्याचा विक्रम केला होता.
शहरयार बट्ट:-
शहरयार बट हा बेल्जियम क्रिकेट संघाचा कर्णधार असून तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ऑगस्ट 2020 मध्ये झेक प्रजासत्ताक विरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात त्याने 50 चेंडूत 11 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 125 धावा केल्या.
शेन वॉटसन :-
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज शेन वॉटसनने 2016 मध्ये भारताविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्या सामन्यात त्याने 71 चेंडू खेळले आणि यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 6 षटकार मारून 124 धावा काढल्या होत्या.