- Advertisement -

आयपीएलच्या इतिहासात ‘या’ 2 फलंदाजाने एका षटकात काढलेत सर्वाधिक रन्स, या दिग्गज संघाचा गोलंदाज करत होता गोलंदाजी…

0 16

आयपीएलच्या इतिहासात या एका षटकात फलंदाजाने काढलेत सर्वाधिक रन्स, या दिग्गज संघाचा गोलंदाज करत होता गोलंदाजी…


जेव्हापासून आयपीएल सुरु झाले आहे तेव्हापासून अनेक दिग्गज खेळाडूंनी अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले. काही खेळाडूंनी त्यांचे ते विक्रम मोडून पुन्हा नव्याने त्यापेक्षा मोठ्या आकड्यांचे विक्रम स्थापित केले. हे चक्र असेच सुरु राहणार आहे. मात्र काही विक्रम हे असेही आहेत जे म्हणतात ना त्यांना मोडणे ‘मुश्कीलचं नाय तर नामुमकीन’ आहे.

होय, मित्रांनो आयपीएल 2023 सुरु होण्यासाठी केवळ1 दिवस बाकी आहे. उद्या गुजरातच्या अहमदाबाद येथी नरेंद्र मोडी स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आयपीएल २०२३चा पहिला सामना रात्री 7:30 वाजता खेळणार आहे. आयपीएलची ही मेजवानी तब्बल 2.5 महिने चालणार आहे.

 फलंदाज ख्रिस गेल

आज आम्ही तुम्हाला आयपीएल मध्ये  झालेल्या अश्याच एका विक्रमाबद्दल सांगणार आहोत जो मोडणे जवळपास अशक्य असे आहे. चला तर जाणून घेऊया कोणता आहे तो विक्रम..

तर मित्रांनो हा विक्रम आयपीएलमध्ये दोन खेळाडूंच्या नावावर आहे. एक म्हणजे वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आणि दुसरा  म्हणजे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा. या दोघांच्याही नावावर आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम संयुक्तरित्या दर्ज आहे.

रवींद्र जडेजाने 2021च्या आयपीएलमध्ये रवींद्र जडेजाने चेन्नईकडून खेळतांना आरसीबीच्या हर्षल पटेलला एका षटकात 36 रन्स  काढले होते. चेन्नईकडून कोणत्याही फलंदाजाने एका षटकात काढलेले हे सर्वोत्तम रन्स आहेत.

फलंदाज

यासोबतचा हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर सुधा आहे. तसं पाहायला गेलं तर त्याने एका षटकात 37 रन्स काढले आहेत. मात्र एक रन नो बॉलचा असल्यामुळे तो गेलच्या नावावर जमा झाला नाही. ज्यामुळे तो एका षटकात 36 धावाच आपल्या नावावर करू शकला.2011 मध्ये आरसीबीकडून खेळतांना गेलने प्रशांत परमेश्वरमला 37 रन्स मारले होते. हा आयपीएल मधील आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.


हेही वाचा:

IPL 2023 मध्ये CSK या 4 खेळाडूंच्या मदतीने मोठा खेळू शकते, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

Leave A Reply

Your email address will not be published.