एकदिवसीय क्रिकेटमध्ये सामना जिंकून देण्यात सलामीच्या फलंदाजाचा खूप मोठा रोल असतो. सलामीचे फलंदाज तडाखेबाज सुरुवात करून विरोधी संघाचे मनोबल तोडण्यासाठी आक्रमक खेळायला सुरुवात करतात. विश्वचषकसारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये सलामीचे फलंदाज सामन्याच्या पहिल्याच षटकात स्फोटक फलंदाजी करून सर्वाधिक धावा काढल्या आहेत. या विक्रमावर टाकलेला एक प्रकाश.
विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू.
कॅनडाचा सलामीचा फलंदाज जॉन डेविन्सन याने न्यूझीलंडविरुद्ध 2007 मध्ये विश्वचषकात खेळताना पहिल्या षटकात धुमधडाका केला होता. सामन्यातील पहिल्या षटकात सर्वाधिक 14 धावा काढल्या होत्या. विश्वचषक स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यातील पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये हा खेळाडू पहिल्या स्थानावर आहे. हा विक्रम गेल्या अनेक वर्षापासून अबाधित आहे.
न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज मार्टिन गुप्टील याने झिंबाब्वे विरुद्ध 2011 मध्ये खेळताना पहिल्या षटकात 14 धावा काढल्या होत्या. यंदाच्या विश्वचषकातून न्यूझीलंड संघात तो स्थान मिळवण्यास अपयशी ठरला. मागील विश्वचषक स्पर्धेत त्याने दिशतक ठोकले होते. विश्वचषक स्पर्धेत एकच सामन्यात सर्वाधिक धावसंख्या काढणारा तो खेळाडू आहे.
न्यूझीलंडचा सलामी वीर क्रेग मॅकमिलन याने कॅनडाविरुद्ध 2003 साक खेळताना पहिल्या षटकात 13 धावा काढल्याची नोंद आहे. सध्या तो क्रिकेटमधून निवृत्त झाला असून निवृत्तीनंतर काही दिवस तो न्यूझीलंडचा प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. आपल्या कारकिर्दीत त्याने एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्याचे नाव होते.
अफगाणिस्तानचा हजरत उल्हास जजई याने इंग्लंडविरुद्ध 2019 साली खेळताना पहिला षटकात 12 धावा केल्या होत्या. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
बांगलादेशचा युवा सलामीचा फलंदाज लिटन दास याने 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना पहिल्या षटकात 12 धावा केल्याची नोंद आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याचा फॉर्म डळमळी झालेला दिसून येतो.
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी 2011 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध खेळताना पहिल्याच षटकात 12 धावा काढल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक सर्वाधिक मोठमोठे विक्रम करण्यामध्ये वीरेंद्र सेहवाघ पुढे आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे विश्वचषकातील सामन्यात पहिल्याच ओव्हर मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये स्टार खेळाडूंनी भरलेल्या ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्टइंडीज, साऊथ आफ्रिका या देशाचे खेळाडू कुठेच दिसून येत नाहीत. यंदाची विश्वचषक स्पर्धा ही भारतात होत आहे आणि भारतीय खेळपट्टी या फलंदाजीस अनुकूल असल्यामुळे येथे या विक्रमामध्ये आणखीन भर पडू शकते.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी