IPL RECORDS: आयपीएल मध्ये सलामीला खेळतांना ‘या’ 7 खेळाडूंनी काढल्यात सर्वाधिक धावा, शिखर धवन आहे या क्रमांकावर..!

IPL RECORDS: आयपीएल मध्ये सलामीला खेळतांना 'या' 7 खेळाडूंनी काढल्यात सर्वाधिक धावा, शिखर धवन आहे या क्रमांकावर..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL RECORDS:  आयपीएल मध्ये कोणत्याही संघासाठी सलामवीरची भूमिका महत्त्वाची असते. धावांचा पाठलाग करत असताना त्यांची भूमिका तर अधिक महत्त्वाची ठरते. आयपीएलमध्ये असे काही फलंदाज आहेत ज्यांनी सलामीला खेळताना जबरदस्त कामगिरी केली आहे. सलामीला खेळताना कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत, याची माहिती पाहिली असता भारतीय खेळाडू यामध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून येते. त्यांच्या कामगिरी वरती एक नजर टाकूया.

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

 

आयपीएलमध्ये सलामीला खेळतांना ‘या’ 7 खेळाडूंनी काढल्यात सर्वाधिक धावा!

1.शिखर धवन

‘गब्बर’ या नावाने प्रसिद्ध असलेला ‘शिखर धवन’ हा सलामीला खेळताना 197 सामन्यात 6210 धावा केल्या आहेत. 2008 पासून आपल्या आयपीएल क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या या खेळाडू ने दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार म्हणून खेळतोय.

IPL RECORDS: आयपीएल मध्ये सलामीला खेळतांना 'या' 7 खेळाडूंनी काढल्यात सर्वाधिक धावा, शिखर धवन आहे या क्रमांकावर..!

2.डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामवीर डेव्हिड वॉर्नर याने 155 सामन्यात 5742 धावा केल्या होत्या. यात चार शतकाची नोंद आहेत. डेव्हिडने दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना त्याची कामगिरी धडाकेबाज राहिली आहे. यंदा तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळतोय. नुकतेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातून निवृत्ती स्वीकारली आहे.

३. ख्रिस गेल

‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. वेस्टइंडीजच्या या धडाकेबाज माजी फलंदाजाने 123 सामन्यात सलामीला खेळताना 4,480 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये गेल ने किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि केकेआर च्या संघाकडून प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलमधील त्याची कामगिरी ही जबरदस्त राहिली आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आता निवृत्ती स्वीकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chris Gayle 👑 (@chrisgayle333)

४.के एल राहुल

भारताचा उपकर्णधार ‘के एल राहुल’ याने सलामीला खेळताना 3363 धावा केल्या आहेत. 2013 पासून आयपीएलच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या केएल राहुल याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या तो लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे.

IPL RECORDS: आयपीएल मध्ये सलामीला खेळतांना 'या' 7 खेळाडूंनी काढल्यात सर्वाधिक धावा, शिखर धवन आहे या क्रमांकावर..!

५.विराट कोहली

भारताची  ‘रन मशीन’ विराट कोहलीने आयपीएलमध्ये सलामीचा फलंदाज म्हणून खेळताना 98 सामन्यात 3,611 धावा केल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे कोहली वनडाऊनच्या पोझिशनला म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आयपीएल मध्ये खेळत असतो. अनेकदा संघाची गरज पाहून तो सलामीला खेळत होता. त्याच्या नावावर आयपीएल मध्ये सात शतके ठोकल्याची नोंद आहे. आयपीएलमध्ये कोहली आणखीन तीन चार वर्षे सहज खेळू शकतो त्यामुळे त्याच्या विक्रमात भर पडू शकते.

6.गौतम गंभीर

IPL RECORDS: आयपीएल मध्ये सलामीला खेळतांना 'या' 7 खेळाडूंनी काढल्यात सर्वाधिक धावा, शिखर धवन आहे या क्रमांकावर..!

केकेआर च्या संघाला दोन वेळा आयपीएलचा चषक जिंकून देणारा कर्णधार ‘गौतम गंभीर ‘याने 123 सामन्यात 3597 धावा केल्या आहेत. 2008 ते 2018 या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची आयपीएल मधील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि त्यानंतर केकेआर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या तो केकेआर संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी काम करतोय.

मुंबई रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सलामीला खेळताना 120 सामन्यात 3595 धावा केल्या आहेत. अजिंक्यने आयपीएलमध्ये राजस्थान व रॉयल्स मुंबई इंडियन्स या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मागील वर्षी तो आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात त्याला सामील करून घेतले होते. तो आता सीएसकेच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळणार आहे.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *