आयपीएलमध्ये शेवटच्या शतकात सर्वाधिक धावा काढणारे हे आहेत धडाकेबाज खेळाडू ;वाचा कोण आहे पहिला स्थानावर..

0
2
आयपीएलमध्ये शेवटच्या शतकात सर्वाधिक धावा काढणारे हे आहेत धडाकेबाज खेळाडू ;वाचा कोण आहे पहिला स्थानावर..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांवर तुटून पडत 33 वेळा चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला. त्यामध्ये शेवटच्या षटकात रोमारियो शेफर्ड याचे वादळ पाहायला मिळाले. त्याने शेवटच्या षटकांमध्ये दोन चौकार आणि चार षटकार ठोकले. शेफर्ड 10 चेंडूचा सामना करत 390 च्या स्ट्राईकरेटने नाबाद 39 धावांची तडाखेबाज खेळी केली. यासह त्याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला.

हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या

रोमारियो शेफर्ड ठरला सर्वांत जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारा खेळाडू.

रोमारियो शेफर्ड हा आयपीएलमध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारा खेळाडू बनला आहे. शेफर्डने याबाबतीमध्ये पॅट कमिन्स याला पाठीमागे टाकले आहे. कमीन्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना 373.33 च्या स्ट्राईक रेटने 15 चेंडू 56 धावा ठोकल्या होत्या. ए बी डिव्हिलियर्स याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 372.72 च्या स्ट्राईकरेटने 11 चेंडूत 41 धावा कुठल्या होत्या तर आंद्रे रसेल याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध 369.23च्या स्ट्राईक रेट ने 13 चेंडूत 48 धावा ठोकल्या होत्या.

 

रोमारियो शेफर्ड याने शेवटच्या षटकामध्ये 32 धावा काढल्या. यासह आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा काढणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी रवींद्र जडेजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्धच्या सामन्यात विसाव्या शतकामध्ये 36 धावा काढल्या होत्या. या यादीत तिसऱ्या नंबर वर रिंकू सिंह तर चौथ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर आहेत तर पाचव्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स आणि रोहित शर्मा आहेत.

 

सामना संपल्यानंतर रोमारिया शेफर्ड याला मोठमोठे फटके मारण्याचा राज विचारण्यात आला तर त्याने मजेशीर उत्तर दिले. शेफर्ड याला मोठे फटके मारण्यासाठी ताकद कुठून आली असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो मजेशीर उत्तर देत म्हणला की,

“आजकाल मी जास्त जेवण करत आहे, विशेष करून सर्व भारतीय पदार्थ आहेत.” मी प्रचंड मेहनत घेतल्यानंतर मला हे यश मिळाले आहे. यासाठी मी नेटवर तासंतास मेहनत केली आहे. मला असे वाटते की, जेव्हा आपण शेवटच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी जातो तेव्हा आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी या स्पष्ट झालेल्या असतात की, आपल्याला नेमके करायचे काय आहे. टीम डेविड यांनी मला स्ट्राइकवर राहून मोठे फटके मारण्याचा सल्ला दिला होता.

 

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या यांना देखील रोमारियोचे कौतुक केले. तो म्हणाला की,

“रोमारियो याने आम्हाला विजय मिळवून दिला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रोमारिया असा होता. तो ही माझा आवडता खेळाडू बनला आहे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच स्माईल असते. “

आयपीएलमध्ये शेवटच्या शतकात सर्वाधिक धावा काढणारे हे आहेत धडाकेबाज खेळाडू ;वाचा कोण आहे पहिला स्थानावर..

IPL मध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here