ODI Records: ‘या’ 4 भारतीय फलंदाजांनी वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात ठोकल्यात सर्वाधिक धावा, रोहित शर्माने तर ठोकल्यात एवढ्या धावा..

ODI Records: 'या' 4 भारतीय फलंदाजांनी वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात ठोकल्यात सर्वाधिक धावा, रोहित शर्माने तर ठोकल्यात एवढ्या धावा..

ODI Records:  मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकात जास्तीत जास्त धावा करण्याची फलंदाजांची इच्छा असते आणि त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजही बरेच नाविन्यपूर्ण शॉट्स खेळतात. आज या विशेष लेखात आम्ही तुम्हाला भारतीय संघातील चार महान खेळाडूंची नावे सांगणार आहोत, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा केल्या होत्या.

ODI Records या खेळाडूंनी एकाच षटकात ठोकल्यात सर्वाधिक धावा. (Most runs in single over by Indian player)

1. रोहित शर्मा (Rohit Sharma)-26

भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा भारतीय संघासाठी एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावले होते. त्यात रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज झेवियर डोहर्टीच्या एकाच षटकात २६ धावा केल्या होत्या.

IND vs SA LIVE: कर्णधार रोहित शर्माने केला मोठा कारनामा,'या' बाबतीत आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या यादीत..

2. वीरेंद्र सेहवाग (Virendra  Sehwag)-26

या यादीत भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचाही (Virendra  Sehwag)समावेश आहे. भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात २६ धावा काढल्या होत्या. या षटकात सेहवागने आपल्या बॅटने 5 चौकार आणि एक षटकार मारला होता.

3. झहीर खान (Zahir Khan) -25

या यादीत भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचे (Zahir Khan) नाव पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल, पण या यादीत झहीर खानही तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज हेन्री ओलांगाच्या एकाच षटकात 25 धावा चोपल्या होत्या..

ODI Records: 'या' 4 भारतीय फलंदाजांनी वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात ठोकल्यात सर्वाधिक धावा, रोहित शर्माने तर ठोकल्यात एवढ्या धावा..

ओलंगाच्या या षटकात झहीरने चार चेंडूत सलग चार षटकार ठोकले होते. त्याने एकच घेतला होता, अशा प्रकारे त्याने एका षटकात त्याच्या बॅटने 25 धावा केल्या होत्या, त्याच षटकात भारतीय संघाला दोन धावा अतिरिक्त मिळाल्या. अश्या पद्धतीने टीम इंडियाला हेन्री ओलांगाच्या एका षटकात 27 धावा मिळाल्या होत्या.

4. सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar)-24

सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या 186 धावांच्या डावात सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडचा गोलंदाज ख्रिस ट्रम्पच्या एकाच षटकात 28 धावा काढल्या होत्या, त्यापैकी 24 धावा सचिनच्या बॅटमधून आल्या होत्या आणि 4 धावा अतिरिक्त होत्या.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *