विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे ‘हे’ आहेत भारतीय खेळाडू, ‘हा’ खेळाडू आहे सर्वांत पहिल्या स्थानावर..
कसोटी असो अथवा एकदिवसीय क्रिकेट भरगच्च धावा काढून विक्रम करण्यामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला आहे. सचिन तेंडुलकर,सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खोऱ्याने धावा काढल्या आहेत. आता त्यांचीच परंपरा पुढे रोहित शर्मा आणि विराट कोहली चालवत आहेत. विश्वचषकात त्यांनी केलेले काही विक्रम आजही अबाधित आहेत. आज आपण विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणत्या भारतीय खेळाडूंनी काढल्या आहेत याची माहिती घेणार आहोत. चला तर सुरवात करूया आजच्या या लेखाला.
या भारतीय खेळाडूंनी एकदिवशीय विश्वचषकात काढल्यात सर्वाधिक धावा.
2023 च्या विश्वचषकात ‘या’ दहा खेळाडूंना फोडता आला नाही भोपळाही; 3 भारतीय खेळाडूंचा समावेश.
सचिन तेंडुलकर: एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात सचिन तेंडुलकर अग्रस्थानी आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत सहा विश्वचषक खेळले. या सहा विश्वचषकात त्याने 45 सामन्यात 2278 धावा केल्या आहेत. विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्यामध्ये जगात तो पहिल्या स्थानावर आहे.
View this post on Instagram
रोहित शर्मा: विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित ने तीन विश्वचषकात 20 सामन्यात 1195 धावा काढल्या आहेत. नुकतेच रोहित विराट कोहलीला पाठीमागे टाकत या यादी दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.

विराट कोहली: ‘किंग कोहली’ या नावाने ओळखला जाणारा विराटने 29 सामन्यांमध्ये 1186 धावा कुटल्या आहेत. सध्या तो त्याचा चौथा विश्वचषक खेळत आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये तो आता तिसऱ्या स्थानावर आहे.
सौरव गांगुली: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 21 सामन्यात 1006 धावा कुटल्या आहेत. 1999 साली इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक सौरव गांगुलीने गाजवला होता. त्याच्याच नेतृत्वाखाली 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती.
राहुल द्रविड: ‘मिस्टर डिपेंडबल’ या नावाने ओळखला जाणारा व सध्याचा प्रशिक्षक म्हणून काम करत असलेला भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने त्याच्या कारकीर्दीत विश्वचषकात 22 सामने खेळला आहे. त्यात त्याच्या नावावर 860 धावांची नोंद आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत साखळी सामन्यातच पराभूत झाला होता.
मोहम्मद अझरुद्दीन: भारताचा माजी कर्णधार आणि स्टायलिश फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन याने त्याच्या कारकिर्दीमध्ये चार विश्वचषक स्पर्धा खेळल्या. त्यात त्याने 30 सामन्यात 826 धावा केल्या आहेत.
महेंद्रसिंग धोनी: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी हा देखील या यादीमध्ये सहभागी आहे. एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेत धोनीने 29 सामन्यात 780 धावा केल्या आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 साली विश्वचषक जिंकला होता.
युवराज सिंग: भारतात 2011 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मालिकावीरचा किताब पटकावणाऱ्या युवराज सिंगने आपल्या कारकिर्दीत 23 सामन्यात 738 धावा केल्या आहेत. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
वीरेंद्र सेहवाग : टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने विश्वचषकात सलामीला खेळताना एकूण 22 सामन्यात 843 धावा कुटल्या आहेत. 2011 साली झालेल्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता.
कपिल देव: 1983 साली झालेल्या विश्व विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत विश्वचषकात 26 सामने खेळले आहेत. त्यात 669 धावांची नोंद त्यांच्या नावे आहे.
तर मित्रांनो, हे होते ते भारतीय फलंदाज ज्यांनी विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधीक धावा काढल्या आहेत.या यादीत भारताच्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. असेच माहितीपर लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..