IND vs ENG: हे आहेत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारे 9 भारतीय खेळाडू, एकाने तर अक्षरशा इंग्लंडच्या गोलंदाजांची केलीय तुफान धुलाई..!

IND vs ENG: हे आहेत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारे 9 भारतीय खेळाडू, एकाने तर अक्षरशा इंग्लंडच्या गोलंदाजांची केलीय तुफान धुलाई..!

 भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू झाली आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला असून दुसरा सामना सध्या विशाखापट्टणमच्या मैदानावर सुरु आहे. टीम इंडिया या सामन्यात आघाडीवर आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून कसोटी क्रिकेट खेळले जात आहे. तुम्हाला माहिती आहे का भरत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये आजपर्यंत कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक धावा काढल्या आहेत. नाही तर चला मग आजच्या या विशेष फिचरमध्ये आम्ही तुम्हाला अश्या 9 भारतीय खेळाडूबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात सर्वाधिक धावा काढल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारे भारतीय खेळाडू

विराट कोहली:

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या 28 सामन्यांच्या 50 डावांमध्ये 42.36 च्या सरासरीने 1991 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर पाच शतके आणि नऊ अर्धशतके आहेत.

IND vs ENG TEST SERIES: पहिल्या दोन कसोटी सामन्यामधून स्टार खेळाडू विराट कोहली बाहेर, समोर आले मोठे कारण..

चेतेश्वर  पुजारा:

चेतेश्वर  पुजाराने इंग्लंडविरुद्ध 27 सामन्यांच्या 49 डावांमध्ये 39.51 च्या सरासरीने 1778 धावा केल्या आहेत. पुजाराच्या नावावर पाच शतके आणि सात अर्धशतके आहेत.

 

रविचंद्रन अश्विन:

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या 19 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 37.30 च्या सरासरीने 970 धावा केल्या आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या नावावर एक शतक आणि सहा अर्धशतके आहेत.

केएल राहुल:

केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध 12 सामन्यांच्या 22 डावांमध्ये 38.50 च्या सरासरीने 847 धावा केल्या आहेत. राहुलच्या नावावर तीन शतके आणि एक अर्धशतक आहे.

अजिंक्य रहाणे:

अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्ध 21 सामन्यांच्या 38 डावांत 22.70 च्या सरासरीने 840 धावा केल्या आहेत. रहाणेच्या नावावर एक शतक आणि सहा अर्धशतके आहेत.

IND vs ENG: हे आहेत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारे 9 भारतीय खेळाडू, एकाने तर अक्षरशा इंग्लंडच्या गोलंदाजांची केलीय तुफान धुलाई..!

रवींद्र जडेजा:

रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या 16 सामन्यांच्या 27 डावांत 31.96 च्या सरासरीने 799 धावा केल्या आहेत. जडेजाच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके आहेत.

ऋषभ पंत:

ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध 12 सामन्यांच्या 21 डावांमध्ये 39.05 च्या सरासरीने 781 धावा केल्या आहेत. पंतच्या नावावर तीन शतके आणि चार अर्धशतके आहेत.

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

रोहित शर्मा:

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या 9 कसोटी सामन्यांच्या 17 डावांमध्ये 49.80 च्या सरासरीने 747 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर दोन शतके आणि तीन अर्धशतके आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *