विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे ‘हे’ आहेत फलंदाज; वाचा रोहित शर्मा कोणत्या स्थानावर ?
2023 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतोय. त्यामुळे क्रिकेट प्रेमींचे चांगलेच मनोरंजन घडून येत आहे. फलंदाजाने मोठ-मोठे मारलेल्या षटकाराचें व्हिडिओ सोशल मीडियावर फॅन्स वायरल करत आहेत. सर्वाधिक मोठमोठे षटकार ठोकून फलंदाज विक्रम रचत आहेत. आज आपण विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत ठोकलेत सर्वाधिक षटकार
ख्रिस गेल : डाव्या हाताने फलंदाजी करणारा वेस्टइंडीजचा माजी विस्फोट फलंदाज ख्रिस गेल आपल्या क्रिकेट कारकीर्दीत एक एकापेक्षा एक सरश अशा खेळी केल्या आहेत. मैदानावर उतरताच मोठ मोठे फटके मरण्यात माहीर असलेल्या गेल ने विश्वचषकात 34 सामन्यात 49 षटकार ठोकले आहेत. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो पहिल्या स्थानी विराजमान आहे.
एबी डिव्हिलियर्स: आपल्या सुरेख खेळीने लाखो क्रिकेट प्रेमींचे हृदय जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने आपल्या कारकिर्दीत स्फोटक खेळी करत फलंदाजांना घाम फोडायचा. त्याने विश्वचषकातल्या 22 सामन्यात 37 षटकार ठोकले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा : एक दिवसीय क्रिकेटमध्ये तीनदा डबल सेंचुरी ठोकून इतिहास घडवणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने अवघ्या 20 सामन्यात 34 षटकार ठोकले आहेत. यंदाच्या विश्वचषक सामन्यात भारताचे आणखीन सहा सामने बाकी आहेत. प्रत्येक सामन्यात तो धमाकेदार खेळी करत आहे. तो चांगल्या फार्मात असल्याने एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलचा विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मोडू शकतो.
रिकी पॉंटिंग: आपल्या नेतृत्वाखाली संघाला दोनदा चॅम्पियन बनवणारा रिकी पॉंटिंग याने 42 सामन्यात 31 षटकार लगावले आहेत. निवृत्तीनंतर पॉंटिंगने ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक म्हणून काही दिवस काम पाहिले आहे.
ब्रॅडन मॅक्युलम: आपल्या क्रिकेट कारकिर्दीत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा इंग्लंड क्रिकेट संघाचा सध्याचा प्रशिक्षक ब्रॅडन मॅक्युलम याने 27 सामन्यात 29 उत्तुंग षटकार लगावले आहेत.
हर्षल गिब्स: दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक शैलीचा, माजी सलामीवीर फलंदाज हर्षल गिब्स याच्या नावावर 23 सामन्यात 28 षटकारांची नोंद आहे.
सनथ जयसूर्या: 1996 सालच्या विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजीने मैदान गाजवणारा श्रीलंकेचा विस्फोटक माजी फलंदाज सनथ जयसूर्या याने 37 सामन्यात 27 षटकार मारले आहेत.
सचिन तेंडुलकर: भल्या भल्या दिग्गज गोलंदाजाची आपल्या बॅटने बोलती बंद करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 44 सामन्यात अवघे 27 षटकार ठोकले आहेत.
इयान मॉर्गन: इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषकचा किताब मिळवून देणारा कर्णधार इयान मॉर्गन याने 27 सामन्यात 26 षटकार ठोकले आहेत.
सौरव गांगुली: एकेकाळी गोलंदाजांवर दादागिरी करणारा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी 21 सामन्यात 25 षटकार मारले आहेत.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी.