क्रिकेटमध्ये गोलंदाजापेक्षा फलंदाजाचे चाहते अगणित आहेत. त्यातल्या त्यात पहिल्या चेंडूपासून स्फोटक फलंदाजी करत चौकार षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या खेळाडूचे ढीगभर चाहते आहेत. चाहते चहा त्यांना आपल्या आवडत्या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी खूपच आतुर असतात. कारण ते सामन्याच्या कोणत्याही षटकात चौकार षटकारांची फटकेबाजी करत विक्रम रचतात. आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंच्या माहिती देणार आहोत ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये 50 व्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
महेंद्रसिंग धोनी डेविड मिलर 50 व्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
महेंद्रसिंग धोनी: वनडे क्रिकेटमध्ये 50 व्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अव्वल स्थानावर आहे. त्याने 50 व्या शतकात आत्तापर्यंत 23 षटकार ठोकले आहेत.
अब्दुल रझाक: फलंदाजांचा कर्दनकाळ मानला जाणारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अब्दुल रझाक याने 50 व्या शतकात 20 षटकार मारले आहेत. कोणत्याही क्षणात सामन्याचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लावण्यात हा खेळाडू माहीर होता.
डेविड मिलर : ‘किलर मिलर’ या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेविड मिलर यांनी आतापर्यंत 13 उत्तुंग षटकार ठोकले आहेत. या यादीमधील मिलर हा एकमेव ऍक्टिव्ह खेळाडू आहे.
जेकब ओरम: डाव्या हाताने फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा जेकब ओरम याने 12 वेळा 50 व्या षटकात षटकार ठोकण्यात यशस्वी झाला आहे. त्याने एक मॅच विनर खेळाडू म्हणून नाव कमवले आहे. या खेळाडूची कारकीर्द जास्त वेळ टिकली नाही.
जॉश बटलर : सध्याच्या घडीला इंग्लंडचा कर्णधार जॉश बटलर हा गोलंदाजासाठी सर्वात घातक फलंदाज मानला जातो. गोलंदाजांची लाईन आणि लेन्थ बिघडवून टाकण्यात तो माहीर आहे. त्याने नव्या पन्नासाव्या शतकात उंच उंच षटकार मारले आहेत. विश्वचषक 2023 स्पर्धेत तो इंग्लंड संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे.
एबी डिव्हिलियर्स: दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स, न्यूझीलंडचा माजी फलंदाज जेम्स फ्रँकलिन, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी या सर्वच खेळाडूंनी 50 व्या शतकात प्रत्येकी 9 षटकार मारले आहेत. यातील राशीद खान वगळता इतर तिनही खेळाडू निवृत्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, 50 व्या शतकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकाही सलामीला खेळणाऱ्या फलंदाजाचे नाव नाही. यादीतील सर्वच खेळाडू हे अनुक्रमे पाचव्या सहाव्या आणि सातव्या स्थानावर खेळतात. वन डे क्रिकेट मधला हा सर्वाधिक दुर्मिळ विक्रम आहे. वन डे क्रिकेटमध्ये षटकार ठोकणारा रोहित शर्मा, क्रिस गेल याचे या यादीमध्ये नाव दिसत नाही.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी