Most Sixes in ODI: एका एकदिवशीय सामन्यात आतापर्यंत ‘या’ 10 खेळाडूंनी ठोकलेत सर्वाधिक षटकार, एका खेळाडूने तर पाडलाय षटकारांचा पाउस..

Most Sixes in ODI: एका एकदिवशीय सामन्यात आतापर्यंत 'या' 10 खेळाडूंनी ठोकलेत सर्वाधिक षटकार, एका खेळाडूने तर पाडलाय षटकारांचा पाउस..

Most Sixes in ODI: क्रिकेट जगतात दररोज काही ना काही विक्रम होतात तर काही विक्रम मोडीत निघतात. तर आज आपण अशाच एका महान विक्रमाबद्दल बोलणार आहोत. या विशेष फिचरमध्ये आपण “ODI इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 10 फलंदाज (Most Sixes in ODI)”. आणि त्यांच्या आकड्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या मैदानावर त्याने ही खेळी खेळली आणि त्या डावात त्याने कोणत्या देशाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या, त्याने किती चौकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट काय होता, या सगळ्याची आपण आज या रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग, वनडे इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप 10 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया अगदी सविस्तर ..

Most Sixes in ODI: वनडे डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे   10 फलंदाज

इऑन मॉर्गन: एकदिवसीय डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन पहिल्या क्रमांकावर आहे. 18 जून 2019 रोजी मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात, इऑन मॉर्गनने 71 चेंडूत 148 धावांची खेळी केली. त्या डावात इऑन मॉर्गनने १७ षटकार आणि ४ चौकार मारले. त्या डावात इऑन मॉर्गनचा स्ट्राईक रेट २०८.४५ होता.

रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार का नाही? बीसीसीआय माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितले..

रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडे डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 2 नोव्हेंबर 2013 रोजी बेंगळुरू येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात रोहित शर्माने 158 चेंडूत 209 धावांची खेळी केली. त्या सामन्यात रोहित शर्माने एकूण 16 षटकार आणि 12 चौकार मारले होते. त्या डावात रोहित शर्माचा स्ट्राईक रेट १३२.२७ होता.

एबी डिव्हिलियर्स: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. 18 जानेवारी 2015 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात एबी डिव्हिलियर्सने 44 चेंडूत 149 धावांची खेळी केली. या खेळीत एबी डिव्हिलियर्सने एकूण 16 षटकार आणि 9 चौकार लगावले. त्या इनिंगमध्ये एबी डिव्हिलियर्सचा स्ट्राइक रेट 338.63 होता, जो स्वतःच खूप मोठा आकडा आहे.

 IPL 2024: आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, माजी दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा होतोय संघाचा हिस्सा..

ख्रिस गेल: एकदिवसीय डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल, ज्याला युनिव्हर्स बॉस म्हटले जाते, चौथ्या क्रमांकावर आहे. 24 फेब्रुवारी 2015 रोजी कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात ख्रिस गेलने 147 चेंडूत 215 धावांची खेळी केली होती. या इनिंगमध्ये ख्रिस गेलने एकूण 16 षटकार आणि 10 चौकार मारले आणि या इनिंगमध्ये ख्रिस गेलचा स्ट्राइक रेट 146.25 होता.

शेन वॉटसन: एकदिवसीय डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शेन वॉटसन पाचव्या स्थानावर आहे. 11 एप्रिल 2011 रोजी मीरपूर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामन्यात शेन वॉटसनने 96 चेंडूत 185* धावांची खेळी केली. त्या डावात शेन वॉटसनने एकूण 15 षटकार आणि 15 चौकार मारले आणि त्या डावाचा स्ट्राईक रेट 192.70 होता.

कोरी अँडरसन: न्यूझीलंडचा अष्टपैलू कोरी अँडरसन वनडे डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत 6 व्या क्रमांकावर आहे. 1 जानेवारी 2014 रोजी, न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात, कोरी अँडरसनने 47 चेंडूत 131* धावांची खेळी केली. या खेळीत कोरी अँडरसनने 14 षटकार आणि 4 चौकार लगावले आणि कोरी अँडरसनच्या या खेळीचा स्ट्राइक रेट 278.72 होता.

Most Sixes in ODI: एका एकदिवशीय सामन्यात आतापर्यंत 'या' 10 खेळाडूंनी ठोकलेत सर्वाधिक षटकार, एका खेळाडूने तर पाडलाय षटकारांचा पाउस..

ख्रिस गेल: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पहिल्या दहा यादीत वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल सातव्या स्थानावर आहे. या यादीत ख्रिस गेलचे नाव दोनदा आले आहे. 27 फेब्रुवारी 2019 रोजी खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड सामन्यात, ख्रिस गेलने 97 चेंडूत 162 धावांची खेळी केली. ख्रिस गेलने या डावात 14 षटकार आणि 11 चौकार मारले होते आणि या डावात त्याचा स्ट्राईक रेट 167.01 होता.

ENG vs AUS: 'मी माझ्या लोकांची निराशा केली..' विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर जॉस बटलरने केले मोठे वक्तव्य...

जोस बटलर: इंग्लंड क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार जोस बटलर एका वनडे डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. 17 जून 2022 रोजी खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात, जोस बटलरने 70 चेंडूत 162* धावांची खेळी खेळली. जोस बटलरने या डावात एकूण 13 षटकार आणि 8 चौकार मारले आणि या डावात जोस बटलरचा स्ट्राइक रेट 189.18 होता.

थिसारा परेरा: एकदिवसीय डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा फलंदाज थिसारा परेरा नवव्या क्रमांकावर आहे. 5 जून 2019 रोजी माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात, थिसारा परेराने 76 चेंडूत 140 धावांची खेळी केली. थिसारा परेराने या खेळीत 12 षटकार आणि 11 चौकार मारले आणि थिसारा परेराच्या या खेळीचा स्ट्राइक रेट 133.05 होता.

रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडे डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे. या यादीत रोहित शर्माचे नाव दुसऱ्यांदा आले आहे. 13 डिसेंबर 2017 रोजी मोहाली येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात रोहित शर्माने 153 चेंडूत 208 धावांची खेळी केली.या डावात रोहित शर्माने 12 षटकार आणि 13 चौकार मारले. आणि रोहित शर्माच्या या इनिंगचा स्ट्राईक रेट 135.94 होता.

IND vs SL: श्रीलंकेवर मोठ्या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा नाखूष, सामना संपल्यावर केले मोठे वक्तव्य...

तर मित्रांनो हे होते ते 10 फलंदाज ज्यांनी एकदिवशीय क्रीकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. वरीलपैकी कोणता खेळाडू तुमचा आवडता आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटचे असेच वेगवेगळे विक्रम आणि  रंजक किस्से वाचण्यासाठी आमच्या फेसबुकपेज ला अवश्य भेट द्या.


हेही वाचा:

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *