Most Sixes in T-20I: 2023 मध्ये ‘या’ 9 फलंदाजांनी लगावलेत सर्वाधिक षटकार, यादीमध्ये कर्णधारासह 3 भारतीय खेळाडू..

Most Sixes in T-20I: 2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या संपूर्ण वर्षामध्ये जागतिक क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. आशिया कप, एकदिवशीय विश्वचषक 2023 यांसारख्या खास स्पर्धांनी तर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

क्रिकेटचा सर्वांत लहान फोर्मेट असलेला टी-२० सामना सुद्धा या वर्षात भरपूर प्रमाणत खेळला गेला. या टी-२० मध्ये अनेक विक्रम घडले त्यातील एक म्हणजे ‘सर्वांत जास्त षटकार’. आज या विशेष लेखात आपण 2023 मध्ये टी-२० मध्ये सर्वाधिक असे षटकार मारणाऱ्या 9 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

most wicket taker bowler in t 20

T20 आंतरराष्ट्रीय 2023 मध्ये कोणत्या फलंदाजांनी सर्वाधिक षटकार मारले आहेत, आज आपण T20I 2022 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप 9 खेळाडूंबद्दल बोलू आणि त्यांनी किती चौकार मारले, त्यांनी किती डाव खेळले, त्यांचे सर्वाधिक काय होते याचे वर्णन करू.

Most Sixes in T-20I: टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू.

1. सूर्यकुमार यादव :-  या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे भारतीय क्रिकेट संघाचा धोकादायक फलंदाज ‘सूर्यकुमार यादव’, ज्याने 2023 वर्षात T20I मध्ये 31 डावात 106 चौकार, 68 षटकारांसह 1164 धावा केल्या आहेत. या संपूर्ण वर्षात 9 अर्धशतकांसह, सूर्यकुमारने 2 शतके देखील ठोकली आहेत.

2. रोव्हमन पॉवेल :- दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज रोमन पॉवेल आहे, ज्याने 2023 T20I मध्ये 21 डाव खेळले ज्यात त्याने 513 धावा केल्या आणि 23 चौकार, 39 षटकार, दोन अर्धशतके आणि एक शतक ठोकले.

 

3. सिकंदर रझा :- तिसर्‍या क्रमांकावर झिम्बाब्वेचा खेळाडू सिकंदर रझा आहे, ज्याने 2023 T20I मध्ये 23 डाव खेळले ज्यात त्याने 735 धावा केल्या, तसेच 52 चौकार आणि 38 षटकार मारले आणि त्याचा स्ट्राइक रेट 150.92 होता.

 

4. ग्लेन फिलिप्स :-ग्लेन फिलिप्सने T20I 2023 मध्ये एकूण 19 डाव खेळले ज्यात त्याने 716 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 51 चौकार आणि 33 षटकारही मारले. ग्लेन फिलिप्सने 6 अर्धशतके तसेच T20I 2023 मध्ये 1 शतक झळकावले.

Most Sixes in T-20I: 2023 मध्ये 'या' 9 फलंदाजांनी लगावलेत सर्वाधिक षटकार, यादीमध्ये कर्णधारासह 3 भारतीय खेळाडू..

5. निकोलस पूरन :-पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज संघाचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन आहे, ज्याने 2023 टी-20 मध्ये एकूण 22 डाव खेळले आणि त्यात 582 धावा केल्या. यामध्ये निकोलस पूरनने 41 चौकार आणि 32 षटकारही मारले आहेत. यासोबतच पूरनने 41 चौकार आणि 32 षटकार ठोकले आहेत. 5 अर्धशतकेही झळकावली.

 

६. रोहित शर्मा :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T20I 2023 मध्ये 29 डावात 656 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माने 64 चौकार आणि 32 लांब षटकार मारले आहेत आणि 3 अर्धशतकेही ठोकली आहेत आणि सर्वोच्च धावसंख्या 72 आहे. T20I 2022 कर्णधार रोहित शर्माचा सर्वोच्च स्कोअर 72 आहे.

रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार का नाही? बीसीसीआय माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितले..

 

 

७. मोईन अली :- इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने T20I 2023 मध्ये एकूण 22 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 515 धावा केल्या आहेत आणि 4 अर्धशतकांसह 34 चौकार, 31 षटकार ठोकले आहेत.

Most Sixes in T-20I: 2023 मध्ये 'या' 9 फलंदाजांनी लगावलेत सर्वाधिक षटकार, यादीमध्ये कर्णधारासह 3 भारतीय खेळाडू..

8. अँड्र्यू बालबर्नी :- 8 व्या क्रमांकावर आयरिश खेळाडू अँड्र्यू बालबर्नी आहे, ज्याने T2I0 2022 मध्ये 27 डाव खेळले ज्यात त्याने 31 षटकार मारले.

९. हार्दिक पांड्या :- भारतीय क्रिकेट संघाचा आवडता अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने T20I 2022 मध्ये 25 डाव खेळले ज्यात त्याने 30 षटकार मारले.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *