Most Unlucky team in 2023: 2023 ठरले ‘या’ संघासाठी सर्वांत दुर्वेवी वर्ष, क्रिकेटच्या इतिहासातील आजवरची सर्वांत मोठी नाचक्की..

Most Unlucky team in 2023: हे वर्ष संपण्यासाठी आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे.  2023 हे वर्ष एकदिवसीय क्रिकेटसाठी खूप खास होते. आयसीसीची सर्वात मोठी स्पर्धा एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात खेळला गेला. भारतीय संघाला विश्वचषकाचे जेतेपद पटकावता आले नसले तरी एकंदरीत हे वर्ष भारतासाठी खूप चांगले होते.

मात्र, असे काही संघ होते ज्यांच्यासाठी हे वर्ष फारच अशुभ ठरले. या वर्षी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांचे रेकॉर्ड आम्ही तुम्हाला सांगतो. एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्या संघाला सर्वाधिक पराभव पत्करावा लागला आहे?

Most Unlucky team in 2023: 2023 ठरले 'या' संघासाठी सर्वांत दुर्वेवी वर्ष, क्रिकेटच्या इतिहासातील आजवरची सर्वांत मोठी नाचक्की..

Most Unlucky team in 2023:  बांगलादेश ठरला सर्वात दुर्दैवी संघ .

बांगलादेश 2023 मध्ये सर्वाधिक सामने गमावणारा संघ बनला आहे. बांगलादेशने 2023 मध्ये एकूण 32 एकदिवसीय सामने खेळले, त्यापैकी 18 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत बांगलादेशसाठी हे वर्ष अत्यंत अशुभ ठरले आहे. यानंतर UAE हा सर्वाधिक एकदिवसीय सामने हरणारा संघ बनला आहे.

यूएईनेही यावर्षी एकूण 26 सामने खेळले, त्यापैकी 17 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण या यादीत न्यूझीलंडचेही नाव आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या न्यूझीलंड संघाने यावर्षी खेळल्या गेलेल्या एकूण 33 सामन्यांपैकी 17 सामने गमावले आहेत. या यादीत श्रीलंकेचा संघ चौथ्या स्थानावर आहे. यंदा या संघाची कामगिरी चांगली राहिली नाही, श्रीलंकेला विश्वचषकातून वाईटरित्या बाहेर व्हावे लागले.

Most Unlucky team in 2023: 2023 ठरले 'या' संघासाठी सर्वांत दुर्वेवी वर्ष, क्रिकेटच्या इतिहासातील आजवरची सर्वांत मोठी नाचक्की..

श्रीलंकेने यावर्षी एकूण 31 सामने खेळले, त्यापैकी 15 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बरं, नेदरलँडने या वर्षी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. नेदरलँड्सने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मोठा अपसेट निर्माण केला होता, परंतु एकूणच नेदरलँड्सला या वर्षी खेळल्या गेलेल्या एकूण 22 सामन्यांपैकी 16 सामनेही गमवावे लागले.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *