- Advertisement -

T20 मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट घेणारे जगातील टॉप-5 गोलंदाज, भारताच्या या गोलंदाजाचा समावेश 

0 2

 

आपल्या देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. क्रिकेट मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. संघामध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी खूप आवश्यक असते. या दोन्ही गोष्टींचा समतोल असेल तरच संघ कोणताही सामना जिंकू शकतो.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या 5खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी पहिल्याच ओव्हर मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

 

 

भुवनेश्वर कुमार:-

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पहिल्या ओव्हर मध्ये सर्वात जास्त विकेट घेण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी 68 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले असून यादरम्यान त्याने 70 फलंदाजांना बाद केले आहे. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये भुवनेश्वर कुमार ने 14 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

 

 

 

डेव्हिड विली

 

डेव्हिड विली हा इंग्लंडचा माजी गोलंदाज आहे डेव्हिड ने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 34 टी-20 सामने खेळले आणि या सामन्यात त्याने 40 फलंदाज बाद केले आहेत. यातील पहिल्याच षटकात डेव्हिड ने 13 बळी घेतले.

 

अँजेलो मॅथ्यूज:-

श्रीलंका क्रिकेट संघाचा गोलंदाज अँजेलो मॅथ्यूज हा तिसऱ्या स्थानी आहे. अँजेलो मॅथ्यूज ने आपल्या T20 क्रिकेट कारकिर्दीत फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. पण गोलंदाज म्हणून त्याने पहिल्याच षटकात 11 बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

 

टिम साउथी:-

 

या यादीत चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊथी हा आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात 9 विकेट घेतल्या आहेत.

 

डेल स्टेन:-

 

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत पहिल्या षटकात 9 वेळा विकेट घेतल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.