IPL Records: पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे हे आहेत टाॅप 10 गोलंदाज, वाचा कोणता गोलंदाज आहे टॉपवर!

IPL Records: पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे हे आहेत टाॅप 10 गोलंदाज, वाचा कोणता गोलंदाज आहे टॉपवर!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL Records: टी 20 क्रिकेटमध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणे हे खेळाडूंसाठी आव्हानात्मक काम आहे. त्यात जर ते यशस्वी झाले तर संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचल्यासारखे आहे. आयपीएल मध्ये हे काम करणे म्हणून जे गोलंदाजासाठी जणू अग्निपरीक्षाच आहे. कारण आयपीएल मध्ये खेळणारे खेळाडू हे जागतिक कीर्तीचे स्फोटक फलंदाज आहेत. आज आम्ही तुम्हाला आयपीएल मधील पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची माहिती देणार आहोत.

IPL Records: पॉवर प्ले मध्ये  या गोलंदाजांनी घेतलेत सर्वाधिक विकेट्स.

१.भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमधील पॉवर प्ले मधला सर्वाधिक खतरनाक वेगवान गोलंदाज मानला जातो. भूविने पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 61बळी घेतली आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणारे या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फॉर्म आणि फिटनेसने बरेच सतावले आहे. मात्र आयपीएल मध्ये त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे.

आयपीएल मध्ये सर्वाधिक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये भारतीय गोलंदाज आघाडीवर: पहा कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

२.संदीप शर्मा

आयपीएल स्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या ‘संदीप शर्मा’ याने पॉवर प्ले मध्ये 55 गडी बाद केल्याची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून त्याला खेळण्यासाठी जास्त संधी भेटली नाही. आयपीएलमध्ये तो पंजाब संघाकडून खेळतोय.

3.दीपक चहर

चेन्नई सुपर किंग्सचा मध्यम गती वेगवान गोलंदाज दीपक चहर हा आयपीएल मधील पॉवर प्ले मध्ये 53 गडी बाद केले आहेत. पॉवरप्ले मध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसरा गोलंदाज आहे.

4.उमेश यादव

‘विदर्भ एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेला उमेश यादव याने आयपीएल मध्ये 93 गडी बाद केले आहेत. पॉवर प्लेमध्ये तो देखील जबरदस्त गोलंदाजी करतो. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरच्या संघाचे नेतृत्व केले आहे.

IPL Records:  पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे हे आहेत टाॅप 10 गोलंदाज, वाचा कोणता गोलंदाज आहे टॉपवर!

5.जहीर खान

‘जॅक’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा माजी खेळाडू जहीर खान याने 52गडी बाद केल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये त्याच्या गोलंदाजी खेळून काढणे फलंदाजास एक मोठे आव्हान असायचे.

6.ट्रेंट बोल्ट

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने पॉवर प्ले मध्ये 50 गडी बाद केल्याची नोंद आहे. आयपीएल मध्ये याने केकेआर आणि आरसीबीच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

IPL Records:  पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे हे आहेत टाॅप 10 गोलंदाज, वाचा कोणता गोलंदाज आहे टॉपवर

7. इशांत शर्मा

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने देखील पॉवर प्ले मध्ये 50 गडी बाद केल्याची नोंद आहे. यापूर्वी तो हैदराबाद आणि केकेआर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 

8.आर अश्विन

भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन याने आयपीएल मधील पॉवर प्ले मध्ये 47 फलंदाजांना आपल्या फिरकेच्या जाळ्यात ओढले. सध्या तो जबरदस्त फॉर्मत आहे. त्यामुळे या विक्रमामध्ये आणखीन भर होऊ शकते. आयपीएल मध्ये त्याने त्याची सुरुवात सीएसके संघाकडून केली होती.

IPL Records:  पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे हे आहेत टाॅप 10 गोलंदाज, वाचा कोणता गोलंदाज आहे टॉपवर!

9.मोहम्मद शमी

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 46 गडी बाद केले आहेत. यंदा तो दुखापतग्रस्त असल्याने आयपीएल मधून माघार घेतली आहे.

10. धवल कुलकर्णी

मुंबई रणजी संघातील वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याने पावर प्ले मध्ये 44 गडी बाद केल्याची नोंद आहे.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *