लहानपणीच रस्ते अपघातात आई वडिलांचं छत्र हरवल, मेहनत करून पूर्ण केले आई वडिलांनी बघितलेले स्वप्न, बनली सर्वात मोठी अधिकारी

आई वडिलां शिवाय प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं आयुष्य हे अपूर्ण असतात. आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचा वाटा हा आई आणि वडिलांचा असतो. या मतलबी जगात आई वडीलांशिवाय जगणे खूप कठोर आहे.
आजकाल आपण अनेक वेगवेगळा IAS ऑफिसर च्या जीवन प्रवास कहाण्या ऐकल्या परंतु आज आपण या लेखात अश्या मुलीची कहाणी सांगणार आहोत ज्यामध्ये लहानपणी आई आणि वडील वारल्यानंतर मेहनत आणि कष्ट करून आई वडिलांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे.
उत्तराखंड राज्यातील देहराडून जिल्ह्यातील लहानशा गावात मोनिकाचा जन्म झाला. मोनिका लहानपणापासून शाळेत आणि अभ्यासात हुशार होती. परंतु दुर्दैव असे की लहानपणी च मोनिका ची आई आणि वडील एका रस्ते अपघातात मरण पावले. तरी सुद्धा न डगमकता आणि मेहनत करत मोनिका शिकत राहिली.
मोनिका च्या आई आणि वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने मोठ्या पदावर कार्यरत असावे. परंतु वडील आणि आई च्या निधनानंतर ते अधुर स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोनिका धडपड करू लागली. 5 ते 12 शिक्षण पूर्ण झाल्यावर मोनिका ने मद्रास मेडिकल कॉलेज मद्ये एमबीबीएस करू लागली त्याचबरोबर तिने UPSC परीक्षेची तयारी सुद्धा करायला सुरुवात केली.
Upsc ची पहिली परीक्षा मोनिकाने 2015 साली दिली परंतु स्कोर जास्त नसल्यामुळे तिला यातून बाहेर पडावे लागले. नंतर दुसऱ्या वेळी 2016 मध्ये मोनिका थोड्या नंबर ने तिची रँक हुकली. तरीसुद्धा निराश न होता मोनिका ने आपले प्रयत्न सुरू ठेवले. मात्र 2018 मध्ये मोनिकाने UPSC ची परीक्षा पास करून 577 रँक मध्ये आली.
IAS झाल्यावर अनेक लोकांनी तिला शुभेच्छा दिल्या परंतु त्या वेळी ती आपल्या आई वडिलांची खूप आठवण काढते. आई आणि वडिलांनी बघितलेले स्वप्न तिने पूर्ण केले होते पण त्यात सहभागी होण्यासाठी तिचे आई आणि वडील नसल्यामुळे तिने निराशा व्यक्त केली होती. आई आणि वडील यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करून तिने आपल्या आई आणि वडिलांच्या आत्म्याला शांती पोहचवली आहे.
हेही वाचा: