MS DHOLI PLAYING IN IPL 2025?: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या संघ मालकांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू घोषित करण्यावर चर्चा झाली. आता धोनीला अनकॅप्ड खेळाडू बनवण्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी वृत्तानुसार, बीसीसीआय जुना नियम पुन्हा लागू करू शकते. या धोरणांतर्गत धोनीला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते, ज्यामुळे माही आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसेल याची देखील खात्री होईल.
हा नियम पूर्वीही अस्तित्वात होता, पण तो कधीच वापरला गेला नाही. आता हा नियम परत आणण्याची चर्चा आहे. सध्या, एक कॅप्ड खेळाडू म्हणून, धोनीला चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून प्रति मोसमात 12 कोटी रुपये मिळत आहेत, परंतु जर तो अनकॅप्ड खेळाडू झाला तर त्याचे वेतन 4 कोटी रुपये कमी होऊ शकते.
अनकॅप्ड खेळाडूचे नियम काय आहेत?
एखाद्या खेळाडूला निवृत्त होऊन पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झाला असेल, तर त्याला कॅप्ड मधून अनकॅप्ड खेळाडूमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. हा नियम आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून 2021 पर्यंत लागू होता, परंतु कोणत्याही संघाने त्याचा वापर न केल्यामुळे 2022 मध्ये तो काढून टाकण्यात आला.
धोनीच्या गुडघ्याची दुखापत आयपीएल 2024 मध्ये स्पष्टपणे दिसून आली होती, तरीही तो संपूर्ण हंगाम खेळला. या दुखापतीमुळे तो अनेकदा सातव्या किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. त्यामुळे धोनी आयपीएलमधून निवृत्त होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू झाली, मात्र अधिकृत घोषणा न झाल्याने चाहत्यांना अजूनही आशा आहे की एमएसडी मैदानात दिसेल.
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..