“जलवा है माही का यहा” भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात स्क्रीनवर दिसला धोनी तर लोक लागले धोनी- धोनी नावाचा जल्लोष करायला…पत्नी साक्षीसोबत सामना पाहण्यास आला धोनी.. व्हिडीओ होतोय व्हायरल..
न्यूझीलंडकडून एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता टी-20 मालिकेवर लक्ष देऊन आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना आज रांचीमध्ये खेळला जात आहे, रांची हे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे होम ग्राउंड आहे, त्यामुळे धोनीही सामना पाहण्यासाठी पोहोचला आहे.
Dhoni watching the match from stadium. pic.twitter.com/YqhhiIOCW7
— Johns. (@CricCrazyJohns) January 27, 2023
भारत न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी एमएस धोनी पत्नी साक्षीसोबत रांचीच्या स्टेडियमवर पोहोचला. याआधी त्याने काल टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचीही भेट घेतली होती, तर धोनीने रांचीमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही भेट घेऊन संवाद साधला होता.
मॅचच्या आधीही धोनीचे फोटो शेअर झाले होते, तर आज मॅच पाह्तानाचे त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताहेत.
MS Dhoni Pavilion – the face of Ranchi. pic.twitter.com/Oq6Q9mhuE4
— Johns. (@CricCrazyJohns) January 27, 2023
रांची स्टेडियम हे एमएस धोनीचे होम ग्राउंड आहे, धोनीने आपल्या क्रिकेटची सुरुवात रांची शहरातूनच केली होती. धोनीनेही या स्टेडियममध्ये सामने खेळले आहेत. तर निवृत्तीनंतर स्टेडियममध्ये धोनीच्या नावाने स्टँडही बनवण्यात आला आहे. याआधी धोनीने मैदानावर पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचीही भेट घेतली होती.

धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी मैदानात सामना पाहतांना लोकांना स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर दिसताच मैदांत लोकांनी धोनीच्या नावाने साद घातली. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झाल तर, प्रथम फलंदाजी करतांना न्यूझीलंड संघाने 6 गडी गमावून 176 धावा काढल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी 177 धावा काढाव्या लागणार आहेत.
हे ही वाचा..
पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू स्वतःला म्हणतोय विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ..
हृदयद्रावक घटना!गोलंदाजी करत असताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव