- Advertisement -

माहीभाईचा जलवा..! महेंद्रसिंग धोनीने मार्क वूडला शेवटच्या षटकात ठोकले 2 कडक षटकार,तब्बल इतके करोड लोक पाहत होते लाईव्ह, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0 0

माहीभाईचा जलवा..! महेंद्रसिंग धोनीने मार्क वूडला शेवटच्या षटकात ठोकले 2 कडक षटकार, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


आयपीएल 2023 सुरु होऊन ४  दिवसच झाले असले तरीही आयपीएलची क्रेझ सध्या चांगलीच वाढली आहे. आज आयपीएलमध्ये चेन्नई आणि लखनऊ यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जात आहे.नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या के  एल राहुलचा निर्णय चेन्नईच्या सलामीविराणी चुकीचा ठरवला.

चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवोन केनवेने जबरदस्त सुरवात देत  पहिल्या विकेटसाठी 110 धावांची मोठी भागीदारी केली. त्यांनतर फलंदाज शिवम दुबे अ,मोईन आली आणि बेन स्टोक्स यांनी संघाचा डाव सावरत धावा काढल्या .

चेन्नईकडून अंतिम षटकामध्ये फलंदाजीस आला चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिग धोनी आणि चेपॉक मैदानावर एक गदारोळ उडाला. सर्वत्र धोनी-धोनी नावाचा जल्लोष होताना दिसला. एवढच काय तर स्वतः समालोचकांनी मैदानातील प्रेक्षकांचा आवाज लोकांना ऐकवण्यासाठी आपल समालोचन काही वेळासाठी थांबवलं.

महेंद्रसिंग धोनी

तब्बल 3 वर्षानंतर धोनी चेन्नईच्या मैदानावर खेळण्यास उतरला होता. आणि त्याला घरच्या मैदानावर खेळताना पाहून प्रेक्षक अतिशय उत्साहात होते.19व्या  षटकात फलंदाजीस येताच धोनीने करोडो प्रेक्षकांना नाराज केले नाही .

पहिल्याच चेंडूवर धोनीने गोलंदाज मार्क वूडला एक उत्तुंग षटकार लगावला. आणि प्रेक्षकांनी जल्लोष केला. वूडच्या दुसर्या चेंडूवर सुद्धा कर्णधार धोनीने षटकार ठोकला. लगातार २ चेंडूवर २ षटकार ठोकून धोनीने चाहत्यांचे मने जिंकली मात्र तिसर्या चेंडूवर वूडने धोनीला बाद केले. मात्र   तोपर्यंत धोनीने  आपले काम केले होते आणि संघाच्या धावसंखेत मोलाचे योगदान दिले.

धोनीला फलंदाजी करतांना पाहत होते तब्बल 1.6करोड लोक…

20 व्या षटकात धोनीफलंदाजी करत असतांना जिओ सिनेमावर तब्बल 1.6करोड लोक लाइव्ह सामना पाहत होते. धोनीची क्रेझ यावरून लक्षात येते. जिओ सिनेमावरील हि आजवरची सर्वांत मोठी आकडेवारी होती.

पहा व्हिडीओ:

प्रथम फलंदाजी करतांना चेन्नईने 7गाडी गमावून 217 धावांचा डोंगर उभा केला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (57) आणि डेवोन केनवे (47) यांनी सर्वाधिक धावा केल्या. लखनऊ संघाला विजयासाठी आता 218 धावांची आवश्यकता आहे. हा सामना कोण जिंकेल तुम्हाला काय वाटत?


हेही वाचा:आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

Leave A Reply

Your email address will not be published.