धोनी जैसा कोई नही…! आयपीएल मधील आकडेवारी दमदार; वाचा त्याच्या कारकीर्दीचा आलेख.

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी काही तासांचा अवधी शिल्लक असताना महेंद्रसिंग धोनी याने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नेतृत्व पदाचा राजीनामा दिला असून संघ व्यवस्थापने त्याच्या जागीच संघातील युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड यांची कर्णधार पदी नियुक्ती केली आहे. ऋतुराज हा चेन्नई सुपर किंग चा चौथा कर्णधार ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील आयपीएल 2024 मधला पहिला सामनाआज 22 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्या आधी धोनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल असे बोलले जात आहे. त्याची आयपीएल मधील कामगिरी देखील जबरदस्त राहिली आहे. कर्णधार या नात्याने त्याने चेन्नई सुपर किंगला भरभरून असे यश दिले आहे. आयपीएलच्या इतिहासातला तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

अशी आहे महेंद्रसिंग धोनीची आयपीएल कारकीर्द.

भारतीय क्रिकेट संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी टी-20 विश्वचषक 2007, वन डे विश्वचषक 2011 व आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 या तीन स्पर्धेत विजय मिळवला होता. यात महेंद्रसिंग धोनीचा सिंहाचा वाटा होता.

IPL 2024 CSK New Captain: आयपीएल 2024 च्या एक दिवस आधी बदलला चेन्नईचा कर्णधार, धोनी ऐवजी आता हा खेळाडू करणार नेतृत्व..!

आयपीएल तो 2008 पासून चेन्नई सुपर किंग संघाचे नेतृत्व सांभाळत आहे. आयपीएल मध्ये त्याने 212 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 128 सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला तर 82 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर दोन सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

 

आयपीएल मध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा तो एकमेव खेळाडू आहे. तसेच त्याच्या यशाची टक्केवारी देखील अधिक आहे. आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ दहा वेळा अंतिम सामना खेळला आहे. त्यापैकी पाच वेळा त्यांना किताब जिंकण्यात यश आले. 2013 मध्ये बीसीसीआयने या फ्रेंचाइजी वर दोन वर्ष खेळण्यास प्रतिबंध घातला होता.

धोनी जैसा कोई नही...! आयपीएल मधील आकडेवारी दमदार; वाचा त्याच्या कारकीर्दीचा आलेख.

महेंद्रसिंग धोनी 2008 पासून आयपीएल मध्ये खेळतोय त्याने आतापर्यंत 250 सामन्यात प्रतिनिधित्व केल्या आहे त्याने या लीग मध्ये 5082 धावा केल्या आहेत. आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे. विकेट कीपिंग मध्ये देखील त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे दोन्हीने 142 झेल पकडले असून 42 फलंदाजांना यष्टिचित केले आहे.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.