VIRAL VIDEO: पहिल्या टी-20 आधी ‘थाला’ टीम इंडियाच्या खेळाडूंच्या भेटीला..रांचीत सरावादरम्यान महेंद्रसिंह धोनीने खेळाडूंना दिल्या टिप्स, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवशीय मालिकेनंतर आता दोन्ही संघात उद्यापासून तीन सामन्यांची -20 मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवशीय मालिका भारतीय संघाने 3-0 अशी आपल्या खिशात घातल्याने न्यूझीलंड टी-20 मालिका जिंकण्याचापूर्ण प्रयत्न करेल तर दुसरीकडे यंग टीम इंडियाचे लक्ष टी-20 मालिकाही जिंकण्याचे ध्येय असेल.
टी-20 मालीकेचा पहिला सामना उद्या रांची मध्ये खेळवला जाणार आहे. याआधीच टीम इंडिया रांचीमध्ये दाखल झाली असून त्यांनी सरावाला सुरवात केली होती. यादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीने (MS DHONI) रांचीच्या मैदानावर जाऊन युवा खेळाडूंची भेट घेतली आहे.

बीसीसीआयने स्वतः या भेटीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्यात म्हटलंय,’आज रांची येथे प्रशिक्षणासाठी कोण आलंय पहा..’ हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये माजी कर्णधार युवा खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसून येत आहे.
सध्या धोनी रांचीमध्ये वास्तव्यास आहे. टीम इंडियारांचीमध्ये आल्याचे कळताच धोनी स्वतः युवा खेळाडूंना भेटण्यासाठी मैदानात आला आहे.गेल्या बऱ्याच महिन्यापासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. मात्र आता तो संघाला भेटण्यासाठी आल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
Look who came visiting at training today in Ranchi – the great @msdhoni! 😊#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/antqqYisOh
— BCCI (@BCCI) January 26, 2023
युवा खेळाडूंसाठी धोनीचे मार्गदर्शन ठरेल अनमोल..
हा व्हिडीओ जरी छोटा असला तरी, या भेटीदरम्यान धोनी संघासोबत 3/4 असल्याचे म्हटले जातंय. यादरम्यान धोनीने युवा खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यांना मार्गदर्शनही केले. शिवाय पुढील सामन्यांसाठी शुभेच्छाही दिल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
धोनी मैदानावर येण्याआधी हार्दिक पंड्या धोनीच्या रांची येथील घरी जाऊन आला.
माजी कर्णधार धोनीने खेळाडूंना भेट देण्यापूर्वी टीम इंडियाचा टी-२० कर्णधार हार्दिक पंड्या रांचीत दाखल होताच सर्वांत आधी धोनीच्या घरी जाऊन आला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत ही माहिती दिली. फोटोमध्ये धोनी आणि पांड्या बाईक वर बसलेले दिसत आहेत.
View this post on Instagram
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका उद्यापासून सुरु होत आहे. पहिला सामना उद्या रांची येथे खेळवला जाणार आहे तर त्यानंतचे दोन सामने लखनऊ आणि अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत .
हे ही वाचा..
पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू स्वतःला म्हणतोय विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ..
हृदयद्रावक घटना!गोलंदाजी करत असताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव