ऋतुराज गायकवाड ठरला धोनीचा आयपीएल मधील तिसरा कर्णधार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे होते धोनीचे कर्णधार..!

ऋतुराज गायकवाड ठरला धोनीचा आयपीएल मधील तिसरा कर्णधार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे होते धोनीचे कर्णधार..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB vs CSK) यांच्यात पहिला सामना झाला. या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा पराभव करत विजय सलामी दिली. तसेच या सामन्यात एक नवा इतिहास लिहिला गेला. माजी कर्णधार एम एस धोनी अशा खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळला जो की त्याच्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान आहे. तसेच एम एस धोनी आयपीएल मध्ये आतापर्यंत तीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

IPL 2024:  या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलाय महेंद्रसिंग धोनी .

1. ऋतुराज गायकवाड

आयपीएल सुरू होण्याआधी एक दिवस अगोदर चेन्नई सुपर किंग ने आपला कर्णधार बदलला. ऋतुराज गायकवाड कडे संघाने नेतृत्वाची धुरा सोपवली. तो सी एस के चा चौथा कर्णधार ठरला. यापूर्वी एम एस धोनी सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. ऋतुराज गायकवाड हा महेंद्रसिंग धोनीचा आयपीएल मधला तिसरा कर्णधार ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruturaj Gaikwad (@ruutu.131)

2.स्टीव्ह स्मिथ

2016 आणि 17 मध्ये चेन्नई सुपर किंग्स वर आयपीएल मध्ये खेळण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता.त्यावेळी 2016 मध्ये महेंद्रसिंग धोनी पुणे सुपर जायंट्स संघाचा कर्णधार होता. 2017 मध्ये या संघाने पुन्हा त्यांचा कर्णधार बदलला स्टीव्ह स्मिथ याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी आयपीएल मध्ये धोनी पहिल्यांदा स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळला होता.

3.रवींद्र जडेजा

2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजा याला कर्णधार केले. महेंद्रसिंग धोनी पुन्हा रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळला होता. जडेजा हा धोनीचा आयपीएल मधला दुसरा कर्णधार होता. यंदाच्या वर्षी सीएसकेले पुन्हा त्यांचा कर्णधार बदलत ऋतुराज गायकवाड यांच्याकडे जबाबदारी दिली. ऋतुराज गायकवाड हा धोनीचा तिसऱ्याच कर्णधार ठरला. महेंद्रसिंग धोनी हा सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली देखील खेळला होता. मात्र तो आयपीएल मधला सामना नसून चॅम्पियन्स लीग मधला सामना होता.

ऋतुराज गायकवाड ठरला धोनीचा आयपीएल मधील तिसरा कर्णधार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे होते धोनीचे कर्णधार..!

एम एस धोनीने आयपीएल मध्ये 235 सामन्यांमध्ये नेतृत्व केले होते हे त्याचे आयपीएल मधील 17 वे सीजन होते. 17 पैकी 14 सीजन तो चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळला होता. यंदाचे आयपीएल वर्ष हे त्याचे शेवटचे वर्ष असल्याचे बोलले जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळला होता. सौरव गांगुली हा धोनीचा पहिला कर्णधार होता. 2003 मध्ये महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळेस सौरव गांगुली हे भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यानंतर राहुल द्रविड, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, रोहित शर्मा व महेला जयवर्धने यांच्या नेतृत्वाखाली तो खेळला आहे.

 

धोनी ने दोन विदेशी खेळाडूंच्या नेतृत्वाखाली देखील क्रिकेट सामने खेळला आहे. 2007 मध्ये श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने याच्या नेतृत्वाखाली तीन वनडे सामने खेळला होता. हा सामना एशिया इलेव्हन आणि आफ्रिका इलेव्हन यांच्यात खेळला गेला होता.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *