Cricket News

RR vs KKR: 2 धावांनी सामना गमावल्यानंतर केकेआरला आता आणखी एक मोठा धक्का, स्टार खेळाडू झाला गंभीर जखमी..!

RR vs KKR, RINKU SING INJURED: कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू जखमी: कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध दणदणीत पराभव पत्करावा लागला आहे. कोलकाताला हा सामना सहज जिंकता आला असता, पण अखेर राजस्थानने दमदार पुनरागमन करत शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. या पराभवामुळे कोलकाताला मोठा धक्का बसला आहे. आता केकेआरला आणखी एक धक्का बसला आहे. कोलकाताचा स्फोटक फलंदाज जखमी झाला आहे.

RR vs KKR: 2 धावांनी सामना गमावल्यानंतर केकेआरला आता आणखी एक मोठा धक्का, स्टार खेळाडू झाला गभीर जखमी..!

 

कोलकाता नाईट रायडर्सच्या या स्फोटक फलंदाजाने राजस्थानविरुद्ध आपल्या फलंदाजीने जबरदस्त ताकद दाखवली होती. मात्र या सामन्यानंतर संघाच्या प्रशिक्षकाने या खेळाडूबाबत मोठा खुलासा केला आहे. प्रशिक्षक म्हणाले की, स्फोटक फलंदाज अनेक दिवसांपासून दुखापतग्रस्त आहे, पण तरीही खेळत आहे. त्यामुळेच त्याला फक्त फलंदाजी करायला लावली जात आहे. गेल्या 2-3 सामन्यात या स्फोटक फलंदाजाला मैदानात उतरवले गेले नाही. विशेष म्हणजे जर खेळाडू लवकर तंदुरुस्त झाले नाहीत तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.

RR vs KKR: केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू रिंकू सिंग झाला जखमी..

सामन्याच्या आधी रिंकू सिंग जखमी झाल्याने केकेआरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अद्याप रिंकूच्या हेल्थ बद्दल कोणतेही अधिकृत अपडेट समोर आले नाहीये. चाहते आशा करत आहेत की, त्याची ही दुखापत किरकोळ असावी.

रिंकू सिंगने प्रत्येक वेळी फलंदाजीला उतरून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रिंकू सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. त्याने 9 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 20 धावांची खेळी केली. केकेआरच्या फिनिशरने खुलासा केला की ,दुखापत असूनही तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. दुखापतीमुळे रिंकू क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही.

RR vs KKR: 2 धावांनी सामना गमावल्यानंतर केकेआरला आता आणखी एक मोठा धक्का, स्टार खेळाडू झाला गभीर जखमी..!

फलंदाजीनंतर रिंकू डगआउटमध्ये बसून राहिला आणि त्याच्या जागी वैभव अरोरा पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरला. मात्र, रिंकूने पुढील सामन्यात क्षेत्ररक्षणाबाबत पूर्ण आश्वासन दिले. रिंकूला आशा आहे की, पुढच्या सामन्यापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, जेणेकरून फलंदाजीसोबतच तो मैदानावरही योगदान देऊ शकेल. केकेआरचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनीही रिंकच्या दुखापतीची पुष्टी केली होती.

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणाले,

“रिंकूला थोडीशी दुखापत झाली आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि आम्ही त्याला थोडी विश्रांती देऊ इच्छितो. एकदा तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर तो क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर परत येईल.”

रिंकूने स्वतःच्या दुखापतीबद्दल सांगितले की, “मला हलकी दुखापत आहे त्यामुळे मी क्षेत्ररक्षण करण्यास सक्षम नव्हते. 21 तारखेला होणाऱ्या पुढील सामन्यात मी पूर्णपणे क्षेत्ररक्षण करेन.”

====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button