रांचीतील लहान मुलांच्या गोलंदाजीवर एमएस धोनीची तुफान फटकेबाजी; पाहा व्हिडिओ..
भारतात ७ नंबरची जर्सी परिधान करण्याचा हक्क कोणाला असेल तर, तो खेळाडू म्हणजे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २००७ टी -२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून दिला. काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येतो. आगामी हंगामात देखील तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. या हंगामासाठी त्याने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२३ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एमएस धोनी कसून सराव करताना दिसून येत आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एमएस धोनी रांचीतील युवा खेळाडूंसोबत सराव करताना दिसून येत आहे. यादरम्यान तो मोठ मोठे फटके खेळताना दिसून येत आहे.
MS Dhoni smashing 6s during today’s practice session! #Dhoni #IPL2023 #CSK @msdhoni pic.twitter.com/ZiVROmMVs4
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) January 30, 2023
गतवर्षी झालेल्या हंगामात एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एमएस धोनीने कर्णधारपद स्वीकारले होते. आगामी हंगाम हे एमएस धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचे हंगाम असू शकते.
हे ही वाचा..
‘शाहीन समोर बुमराह काहीच नाही..’ पाकिस्तानी दिग्गजाचे बुमराह बद्दल वादग्रस्त वक्तव्य
खवळलेली नदी शांत करण्यासाठी लेशान येथील डोंगरावर महाकाय अशी ‘बुद्ध मूर्ती’ उभारण्यात आलीय..