World Cup Memory: महेंद्रसिंग धोनीचा वर्ल्डकपमधील ‘हा’ विक्रम आजपर्यंत कोणताच खेळाडू मोडू शकला नाहीये, रोहित-विराट तर आहेत खुप लांब..!
ODI World cup 2023: भारतीय संघ 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी आणि 12 वर्षांपासून विश्वचषक (Worldcup) विजेतेपदाची वाट पाहत आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटची दोन्ही विजेतेपदे जिंकली होती. माजी भारतीय दिग्गज महेंद्रसिंग धोनीने (Ms dhoni) 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, परंतु विश्वचषकामधील त्याचा विक्रम आजूनही तसाच आहे, जो क्वचितच कोणी मोडू शकेल.
T20 विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकण्याव्यतिरिक्त, धोनीने कर्णधार म्हणून ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चे विजेतेपद देखील जिंकले आहे.
वर्ल्ड कप 2023 (Worldcup 2023) लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे. पण धोनीच्या कर्णधारपदाच्या विक्रमाला क्वचितच रोहित मोडू शकेल. भारतीय क्रिकेटमध्ये २४ सप्टेंबर हा दिवस खूप खास आहे. 24 सप्टेंबर 2007 रोजी भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवले. कर्णधार म्हणून त्याने 15 विजेतेपद पटकावले आहेत.
42 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत 2 जेतेपद पटकावले. एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर , धोनीने 7 जेतेपद पटकावले. यामध्ये 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. T20 लीगबद्दल बोलायचे झाले तर त्याने चेन्नई सुपर किंग्सला 4 वेळा IPL आणि 2 वेळा चॅम्पियन्स लीग T20 चे विजेतेपद मिळवून दिले आहे. अशाप्रकारे माहीने एकूण 15 विजेतेपद पटकावले आहेत. जर आपण रोहित शर्माच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये 2 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये एक विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएलचे 5 आणि चॅम्पियन्स लीग टी-20 चे एक विजेतेपद जिंकण्यास मदत केली आहे. म्हणजेच रोहितने एकूण 9 जेतेपदे जिंकली आहेत.
कर्णधार म्हणून खेळतांना धोनीच्या विक्रमाच्या आसपासही नाहीत रोहित-विराट

कर्णधार म्हणून विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा T20 लीगमध्ये एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. कर्णधार म्हणून कोहलीला 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. याशिवाय 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणजे कोहलीने संघाला 2 फायनलमध्ये नक्कीच पोहोचवले, पण त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही. कर्णधार म्हणून त्याला आयपीएलमध्ये एकही विजेतेपद मिळवता आले नाही.
सर्वांत जास्त विजेतेपद जिंकणारे खेळाडू.. या खेळाडूच्या नावावर आहे सर्वांत मोठा विक्रम..
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जेतेपदे पटकावणाऱ्या भारतीय कर्णधाराच्या विक्रमावर नजर टाकली तर, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण 11 विजेतेपद पटकावले आहेत. इतर कोणत्याही कर्णधाराला 10 विजेतेपदांचा टप्पा गाठता आलेला नाही. महेंद्रसिंग धोनी 9 विजेतेपदांसह दुसऱ्या, रोहित शर्मा 3 विजेतेपदांसह तिसऱ्या स्थानावर तर कपिल देव 2 विजेतेपदांसह चौथ्या स्थानावर आहे. सौरभ गांगुली, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर यांनी कर्णधार म्हणून प्रत्येकी एक आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जेतेपद पटकावणाऱ्या कर्णधाराबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग अव्वल आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 15 विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ऍलन बॉर्डर १४ विजेतेपदांसह दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिए १२ विजेतेपदांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जरी क्रोनिए आता या जगात नाहीत. मोहम्मद अझरुद्दीन 11 विजेतेपदांसह एकूण चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्विव लॉयड याने कर्णधार म्हणून 10 विजेतेपद पटकावले आहेत. इतर कोणत्याही कर्णधाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 जेतेपदे जिंकता आलेली नाहीत.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..