Ms Dhoni Retirement: पुढील आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही? चेन्नईच्या दिग्गजाने स्पष्टच सांगितलं..!

0
13
Ms Dhoni Retirement: पुढील आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही? चेन्नईच्या मालकाने स्पष्टच सांगितलं..!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

 Ms Dhoni Retirement: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीने चेन्नईचा महान यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने ‘पुढील काही वर्षे’ इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळत राहावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आयपीएलचा आणखी एक हंगाम संपणार असल्याने धोनीच्या भविष्याबाबत पुन्हा एकदा अटकळ बांधली जात आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, माही आयपीएलमध्ये खेळत आहे. तो कधी निवृत्त होणार या प्रश्नाचे उत्तर फक्त धोनीच देऊ शकतो.

महेंद्रसिंग धोनीला नक्की काय झाले? या कारणामुळे सामना संपल्यानंतर इलेक्ट्रिक स्ट्रायकर पुरस्कार घ्यायला आला नाही धोनी, धोनी ऐवजी ऋतुराज गायकवाडने घेतला पुरस्कार..!

 Ms Dhoni Retirement: आयपीएल 2025 मध्ये धोनी खेळणार की नाही?

आता चेन्नईच्या स्टाफ मधील एक दिग्गाजाने यावर भाष्य केले आहे. अराउंड द विकेट शोमध्ये, जेव्हा हसीला विचारण्यात आले की, धोनी पुढच्या वर्षी परत येईल का? तेव्हा तो म्हणाला,

“या टप्प्यावर तुमचा अंदाज माझ्यासारखाच चांगला आहे.  धोनीच्या निवृत्तीबाबत आपण फक्त अंदाज लावू शकतो. पण धोनी मागच्या 3 वर्षापासून वयाला साजेसे असे चेन्नईसाठी खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. आम्हाला आशा आहे की ,तो असेच करत राहील.

RCB vs CSK knockout Match: नॉकआऊट सामन्यात शेवटच भिडणार धोनी- कोहली ? पुन्हा कधीही खेळू नाही शकणार सामना.. हे 4 संघ प्ले ऑफमध्ये करतील इंट्री.!

तो अजूनही चांगली फलंदाजी करत आहे. तो चांगली तयारी करतो. तो कॅम्पमध्ये खूप लवकर पोहोचतो आणि खूप चेंडू खेळून सर्व करतो “तो संपूर्ण हंगामात खरोखरच आपले 100% देतोय. म्हणूनच धोनी पुढील वर्षीही संघात असावा असी आमची इच्छा आहे आणि आमी धोनीला तशी विनंती देखील केली आहे, असे हसी म्हणाला..

चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का...! महेंद्रसिंग धोनी झाला दुखापतग्रस्त, आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर; जाणून घ्या काय आहे कारण..!

तो पुढे म्हणाला,

“गेल्या मोसमानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे तो स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच तो फिट होण्यासाठी सराव  करत होता. वैयक्तिक दृष्टिकोनातून, मला आशा आहे की तो पुढील काही वर्षे हे करत राहील, परंतु आम्हाला फक्त प्रतीक्षा करावी लागेल आणि पहावे लागेल. हा निर्णय घेणारा तो एकमेव व्यक्ती आहे.”

IPL 2024 मध्ये धोनीचा धमाका.

गेल्या वर्षी गुडघ्यावर शस्त्रक्रिया होऊनही धोनी दुखण्याशी झुंजत आहे. ही समस्या असतानाही धोनीने आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  आयपीएल 2024 च्या 10 डावात 226.66 च्या स्ट्राईक रेटने 136 धावा करण्यात तो यशस्वी ठरला आहे. या काळात त्याने अनेक षटकारही मारले आहेत. तो क्रमाने खालच्या स्तरावर फलंदाजी करत आहे.

 Ms Dhoni Retirement: पुढील आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही? चेन्नईच्या मालकाने स्पष्टच सांगितलं..!

हसीने आशा व्यक्त केली  की, “मला माहित आहे की चाहत्यांना कदाचित त्याला क्रमवारीत थोडे उंचावर फलंदाजी करताना पाहायचे आहे, परंतु (गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे) आम्हाला त्याचे थोडेसे व्यवस्थापन करावे लागले आणि म्हणूनच तो शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीस येतो.  आणि त्या परिस्थितीमध्ये पहिल्याच चेंडूपासून एवढ्या आक्रमक फलंदाजीसाठी एमएस पेक्षा सरस कोणी मिळणार नाही. धोनीही पुढील हंगामात देखील अशीच खेळी खेळतांना आपल्याला दिसेल अशी इच्छा हसीने व्यक्त केली..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.