MS Dhoni Retirement : 9 वर्षापूर्वी याच दिवशी महेंद्रसिंग धोनीने तोडले होते करोडो चाहत्यांचे मन, क्रिकेटच्या या फोर्मेटमधून अचानक घेतली होती निवृत्ती..

MS Dhoni Retirement : 9 वर्षापूर्वी याच दिवशी महेंद्रसिंग धोनीने तोडले होते करोडो चाहत्यांचे मन, क्रिकेटच्या या फोर्मेटमधून अचानक घेतली होती निवृत्ती..

MS Dhoni Retirement :  ३० डिसेंबर २०१४…म्हणजे आजपासून अगदी ९ वर्षांपूर्वी. मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने होते. मात्र या  कसोटीनंतर महेंद्रसिंग धोनीने आपल्या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले.  ज आता तो कसोटीच्या फॉर्मेटमध्ये दिसणार नाही. कॅप्टन कूलची ही शेवटची कसोटी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मेलबर्न कसोटी ही कॅप्टन कूलची शेवटची कसोटी ठरणार आहे, याची क्रिकेट चाहत्यांना कल्पना नव्हती.

MS Dhoni Retirement: ‘ड्रेसिंग रूममधील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला, कारण कोनालाही वाटलं नाही…’

MS Dhoni Retirement : 9 वर्षापूर्वी याच दिवशी महेंद्रसिंग धोनीने तोडले होते करोडो चाहत्यांचे मन, क्रिकेटच्या या फोर्मेटमधून अचानक घेतली होती निवृत्ती..

त्या दिवसाची आठवण करून देताना रवी शास्त्री म्हणतात की, ड्रेसिंग रूममधील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता, कारण या कसोटीनंतर माही कसोटी फॉरमॅटला अलविदा करेल याची कोणालाही कल्पना नव्हती. वास्तविक, मालिकेतील शेवटची कसोटी मेलबर्न कसोटीनंतर खेळली जाणार होती, परंतु कॅप्टन कूलने आपण शेवटच्या कसोटीचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं.

चौथा कसोटी सामना 6 जानेवारी 2015 पासून सिडनी येथे खेळवला जाणार होता. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या जागी विराट कोहलीने टीम इंडियाचे नेतृत्व केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-0 ने जिंकली.

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीची कसोटी कारकीर्द अशी होती

आकडेवारी दर्शवते की, महेंद्रसिंग धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. ज्यामध्ये 27 सामने जिंकले. माहीच्या नेतृत्वाखाली, टीम इंडिया डिसेंबर 2009 मध्ये नंबर-1 कसोटी संघ बनली आणि जवळजवळ 18 महिने शीर्षस्थानी राहिली. पण आता महेंद्रसिंग धोनीचे कसोटी क्रिकेटमधील युग संपले होते.

MS Dhoni Retirement : 9 वर्षापूर्वी याच दिवशी महेंद्रसिंग धोनीने तोडले होते करोडो चाहत्यांचे मन, क्रिकेटच्या या फोर्मेटमधून अचानक घेतली होती निवृत्ती..

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार झाला होता. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीच्या कसोटी कारकिर्दीकडे लक्ष द्या, या खेळाडूने 90 कसोटी खेळल्या. ज्यामध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. तसेच यष्टिरक्षक म्हणून त्याने 256 झेल घेतले आणि 38 स्टंपिंग केले. (MS Dhoni Retirement)

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *