चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. धोनी t20 क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून 250 सामने खेळले आहेत. धोनीने भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज खेळाडू व आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यांनी नुकतेच या संघाकडून खेळताना 250 सामने खेळणारा पहिला खेळाडू बनला आहे. आज पर्यंत आयपीएल मध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम इतर कोणत्याही खेळाडूला करता आला नाही.
धोनीने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग सीएसके या संघाकडून खेळले आहे. यासह त्याने रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे. कारण सीएसके वर दोन वर्षाचा प्रतिबंध घालण्यात आला होता. महेंद्रसिंग धोनी आयपीएल मध्ये 2008 पासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय.
धोनी या लीग मधला सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा आयपीएलच्या किताबावर मोहर लावली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेच्या संघाने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएल चषकावर नाव कोरले होते. यावरून एक लक्षात येते की, धोनी हा नेतृत्वामध्ये किती सक्षम आहे. पण यंदाच्या आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने सीएसकेच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी आता ऋतुराज गायकवाड हा सीएसके च्या संघाचे नेतृत्व सांभाळत आहे.
एम एस धोनीने याशिवाय आणखीन एका विक्रमावर आपले नाव कोरले आहे. धोनीने सीएसके संघाकडून खेळताना आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. धोनीने चेन्नई कडून 250 सामन्यात 5016 धावा केल्या आहेत. यासह त्याने 23 अर्धशतके ठोकली आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरलेल्या महेंद्रसिंग धोनीने चार चेंडूत 20 धावा केल्या आहेत. त्यामुळे सीएसके संघ 20 षटकात 207 धावा करू शकला. अंतिम षटकात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या महेंद्रसिंग धोनीने हार्दिक पांड्याच्या षटकात सलग तीन षटकार ठोकले. यावेळी महेंद्रसिंग धोनीचा स्ट्राइक रेट 500 च्या वर होता. मुंबई विरुद्धच्या सामन्यावरून एक लक्षात येते की महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.