रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना महिन्याला मिळतो तब्बल एवढे रुपये पगार, कोरोनाच्या काळात 2 वर्ष नव्हता घेतला पगार आकडा वाचून व्हाल चकित..!
सध्या जगभरातील सर्वांत श्रीमंत उद्योगपतीमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव आवर्जून घेतले जाते.ते श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कामगिरी खूप चांगली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजारमूल्य गेल्या आठवड्यात 69,503.71 कोटी रुपयांवरून 17,17,265.94 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी किती पगार दिला जातो.
प्रत्येक कंपनीमध्ये चेअरमन आणि इतर पधादी कारी यांना देखील पगार दिला जातो. त्यामुळे रिलायन्सचे चेअरमेन मुकेश अंबानी यांना किती पगार मिळत असेल असा प्रश्न नक्कीच सर्वाना कधीतरी पडलाच असेल. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अंबानी याच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पगाराविषयी आई त्यांच्यावरील कामाच्या जीम्मेदारीची माहिती देणार आहोत.
View this post on Instagram
मुकेश अंबानी किंवा त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा पगार किती आहे?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा पगार जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण त्यांना प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला २०२० आणि २०२१ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षांसाठी कोणताही पगार मिळाला नाही. त्यांनी स्वेच्छेने पगार सोडला. कोरोना विषाणूच्या साथीचा व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता, ज्यामुळे त्यांनी कंपनीमधील इतर कामगारांना वेळेवर पगार मिळावा, यासाठी आपला पगार स्वइच्छेने सोडला होता.
मुकेश अंबानी यांचा पगार 2020 आणि 21 मध्ये शून्य रुपये होता. तर मुकेश अंबानी यांना 2019-20 मध्ये कंपनीकडून 15 कोटी पगार मिळाला आणि 2008-9 पासून ते 13 कोटी वार्षिक पगार घेत होते. त्यानंतर त्यांनी पगार वाढवला नाही. दुसरीकडे महिन्यावर नजर टाकली तर मुकेश अंबानींचा पगार एका महिन्यासाठी १.२५ कोटी आहे.
त्यांच्या वेतन लाभांमध्ये भरती आणि कमिशन देखील आहे. मुकेश यांची पत्नी नीता अंबानी देखील कंपनीतून पगार घेतात, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डात नॉन-एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. मिडिया रिपोर्टनुसार नीता अंबानी यांना वार्षिक 5 कोटी पगार मिळतो.

रिटेल क्षेत्रातही रिलायन्स जगातील आघाडीच्या कंपन्यांना स्पर्धा देत आहे. दुसरीकडे, ऑनलाइन ते ऑफलाइन, रिटेलपासून घाऊक व्यवसायापर्यंत मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने आपली पकड मजबूत केली आहे.
सध्या Amazon, Flipkart, Walmart सारख्या मोठ्या जागतिक रिटेल कंपन्या रिलायन्सला आपला प्रतिस्पर्धी मानतात. रिलायन्सने अनेक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. आणि आजूनही त्यांच्या यशाचा आलेख चढतच चालला आहे.
तुम्हाला ही माहिती आधी माहिती होती का? आणि जर नसेल तर ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा . असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या फेसुकपेजला लाईक करायला विसरू नका.