- Advertisement -

मुंबई इंडियन्स चा जोफ्रा आर्चर च्या अडचणीत वाढ, १६ वा हंगाम खेळेल की नाही यावर चर्चा तर इंग्लडचे एवढे खेळाडू जखमी

0 1

 

 

 

२०२३ चा आयपीएल चा हा १६ वा हंगाम असुन या हंगामात इंग्लडचे खेळाडू काही चालले नाहीत जे की इंग्लड चे काही खेळाडू जखमी झाले असल्यामुळे ते यावेळी आयपीएल मध्ये खेळू शकले नाहीत. तर काही खेळाडू व्यवस्थित होते मात्र आता तेही दुखापतग्रस्त झाले असल्यामुळे बाहेर गेले आहेत.

 

चेन्नई सुपर किंग चे खेळाडू बेन स्टोक तसेच मोहीन अली मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळू शकले नाहीत तर मुंबई चा जोफ्रा आर्चर देखील सामना खेळू शकला नाही. एवढेच नाही तर जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे खेळाडू आधीच आयपीएल मधून बाहेर पडले आहेत. यावेळी आयपीएल मध्ये इंग्लड चे जास्तीत जास्त खेळाडू बाहेर पडले आहेत. तर आता अशी शंका उधभवली आहे की मुंबई चा जोफ्रा आर्चर हा हंगाम खेळू शकणार आहे का नाही?

 

आयपीएलच्या १६ व्या हंगामात इंग्लड चा जोफ्रा आर्चर मुंबई मधून खेळणार की नाही?

 

चेन्नई सुपर किंग विरुद्ध च्या सामन्यात जोफ्रा आर्चर खेळू शकला नाही. जोफ्रा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे आणि खबरदारी न घेता त्याने सांगितले आहे की मी अजूनही व्यवस्थित नाही. जोफ्रा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात खेळला होता. मात्र जोफ्रा ला तो सामना खूपच महागात पडला होता. विराट कोहली समोर जोफ्रा ची बॉलिंग चालली नसल्यामुळे विराट ने ४ शतकात ३३ धावा केल्या आहेत. २०२२ च्या आयपीएल च्या लिलावात मुंबई इंडियन्स जोफ्रा आर्चर ला खरेदी केले होते.

 

मात्र जोफ्रा ला दुखापत झाली असल्यामुळे तो मॅच खेळू शकला नाही. जोफ्रा आर्चर जवळपास एक वर्ष क्रिकेट पासून दूर होता. अलीकडेच जोफ्रा ने बांगलादेश विरुद्धच्या मालिकेमध्ये आगमन केले होते मात्र त्याही वेळी तो पूर्णपणे तंदुरुस्त न्हवता. जे की आयपीएल च्या पहिल्या सामन्यात देखील आपणास तेच पाहायला मिळाले. दुखापत झाल्यापासून त्याला त्याचा खेळ पकडणे खूप मुश्किल झाले आहे. याच परिस्थितीमुळे हा हंगाम त्यास खेळणे खूप कठीण झाले असल्याचे सांगितले जात आहे.

 

हे खेळाडूही जखमी झाले आहेत :-

 

इंग्लडचा कर्णधार आणि चांगला फलंदाज जोस बटलर ला देखील दुखापत झालेली आहे. ८ एप्रिल ला जो दिल्लीविरुद्ध सामना खेळला गेला त्यामध्ये तो पुर्णपणे तंदुरुस्त न्हवता मात्र तरीही तो सामना खेळला. जर भविष्यात तो अशी रिस्क घेऊ लागला तर त्याची दुखापत गंभीर होऊ शकते.

 

इंग्लड साठी याची सतत ची दुखापत महाग पडू शकते. यंदाच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये 50-50 ट्रोफी खेळली जाणार आहे जे की 50-50 ट्रॉफी चा इंग्लड गटविजेता आहे. आपण इंग्लड च्या जखमी खेळाडूंवर नजर टाकली तर जॉनी बेअरस्टो, तर लियाम लिव्हिंगस्टोन, रीस टोपली हे खेळाडू बाहेर आहेत तर मोईन अली, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स तसेच जोस बटलर देखील तंदुरुस्त नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.