आयपीएलपूर्वी मोठी बातमी! रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद सोडले , या खेळाडू कडे येणार आता संघाची सूत्र
आपल्या देशातील निम्म्याहून अधिक लोक आयपीएल चे दिवाणे आहेत अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण क्रिकेट आवडीने पाहतात. आपल्या देशात अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात परंतु सर्वात जास्त पसंती ही क्रिकेट खेळला दिली जाते. आयपीएल मध्ये खेळण्यासाठी अनेक वेगवेगळ्या देशातून खेळाडू भारतात खेळण्यासाठी येतात. यंदा आयपीएल चा 16 वा सिझन हा उद्यापासून सुरू होणार आहे.

प्रत्येक वर्षी आपल्या भारतात प्रेक्षकांमध्ये सर्वात मोठा वाद असतो तो म्हणजे आयपीएल मुंबई जिंकणार की चेन्नई. तसेच आपल्या देशात या दोन्ही संघाची फॅन्स फोलोईंग मोठ्या प्रमाणात आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला मुंबई इंडियन्स या संघाने अचानक आपला कर्णधार बदलला आहे त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन संघाचा पूर्व कर्णधार रोहित शर्मा च्या जागी कोणता खेळाडू संघाची सूत्र सांभाळणार हे आपण पाहणार आहोत.
आयपीएल ला उद्यापासून सुरुवात होणार आहे आयपीएल चा पहिला सामना हा गुजरात येथे होणार आहे आणि दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स आहे परंतु अचानक मुंबई इंडियन्स संघाने आपला कर्णधार बदलला आहे. पूर्वी रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता परंतु कर्णधार बदलण्यामागे कोणते कारण असेल.
इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्ट नुसार, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आयपीएल चे काही म्हणजेच सुरुवातीचे सामने खेळता येणार नाहीत.कारण आयपीएल च्या फायनलनंतर भारतीय संघाला एका आठवड्यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. तसेच येणारा 2023 चा वर्ल्ड कप हा भारतात होणार असल्यामुळे त्याची सुद्धा तयारी करायची आहे या कारणामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडला आहे.
रोहित शर्मा च्या अनुपस्थित मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद हे भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव कडे जाणार आहे. सूर्यकुमार यादव सुरुवातीपासून मुंबई संघामध्ये खेळत होता परंतु यंदा च्या वर्षी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार बनणार आहे.
सूर्यकुमार यादव च्या आयपीएल करियर बद्दल सांगायचे झाले तर सूर्यकुमार यादव ने आतापर्यंत 62 सामने खेळले असून 59 डावात त्याने 1575 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या उच्च स्कोर हा 82 धावांचा आहे. तसेच आयपीएल मध्ये सूर्यकुमार यादव ने 10 अर्धशतके मारली आहेत.