Mumbai indians bowlers: मुंबई इंडियन्सचे नवे गोलंदाजी आक्रमण आपण पाहिले आहे का? बूमराह व्यतिरिक्त स्टेन गन सारखे आहेत दोन खेळाडू!

0
7
Mumbai indians bowlers: मुंबई इंडियन्सचे नवे गोलंदाजी आक्रमण आपण पाहिले आहे का? बूमराह व्यतिरिक्त स्टेन गन सारखे आहेत दोन खेळाडू!

 Mumbai indians bowlers: मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. त्यांच्याकडे एकापेक्षा एक असे धुरंदर जागतिक कीर्तीचे फलंदाज आणि गोलंदाज आहे. या खेळाडूंच्या जीवावर मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल चषक उंचावला होता. मुंबई इंडियन्सच्या या विजयामध्ये फलंदाजांसोबत गोलंदाजांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पाचही वेळा मुंबई इंडियनच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माने सांभाळली होती. 

मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव सारखे दिग्गज फलंदाज आहे, जे कोणत्याही क्षणी सामन्याचा नूर पलटू शकतात. यंदाच्या वर्षात मुंबई इंडियन्स कडे नऊ गोलंदाज आहेत. त्यापैकी सहा वेगवान गोलंदाज आहेत. हे सर्वच गोलंदाज खूपच खतरनाक आहेत. याच गोलंदाजांवर एक नजर टाकुयात.

 Mumbai indians bowlers: जसप्रीत बूमराह सोडून मुंबई इंडियन्सकडे आहेत हे स्टार गोलंदाज.

Who Is Akash Madhwal The Engineer Breaking IPL Bowling Records For Mumbai  Indians - कौन है आकाश मधवाल, एक इंजीनियर जिसने अपने धांसू प्रदर्शन के दम पर  आईपीएल में मचाई सनसनी, Cricket

1) आकाश मधवाल

मुंबई इंडियन्स कडे आकाश मधवाल नावाचा युवा वेगवान गोलंदाज आहे. त्याने अनेक वेळा नाजूक परिस्थितीमध्ये मुंबईला विकेट मिळून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. मधवालची बॉलिंग स्टाईल ही दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन सारखी वाटते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने टेनिस क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

क्रिकेट खेळण्यासाठी त्याने नोकरीवर पाणी सोडले. 2018 मध्ये त्याला उत्तराखंडला क्रिकेट संघात स्थान मिळाले. त्यानंतर 2019 मध्ये त्याचा नेट बॉलर म्हणून आरसीबीमध्ये समावेश करण्यात आला. यानंतर तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर झाला. सराव सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2023 मध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि केवळ 20 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतलेल्या या खेळाडूने आतापर्यंत सात सामन्यांत 13 बळी घेतले आहेत.

2) जेसन बेहरनडोर्फ

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडोर्फ हा देखील मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये आहे. त्याच्याकडे आयपीएल मध्ये खेळण्याचा जबरदस्त अनुभव आहे. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाकडे चेंडूवर चांगले नियंत्रण आहे. आयपीएल 2024 मध्ये तो आपल्या कौशल्याने चांगलाच धुमाकूळ घालताना दिसू शकतो.

IND vs AUS 2nd T20: सूर्यकुमार और किशन को गेंदबाजी करना मुश्किल, बेहरेनडोर्फ  ने मजाकिया अंदाज में कहा- मैं किसी दूसरे को गेंद सौंप दूंगा | IND vs AUS  2nd T20 ...

3) दिलशान मधुशंका

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका यांच्यावर देखील साऱ्यांच्या नजरा असतील. अलीकडच्या काळामध्ये त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये बरेच बदल केलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एक वेगळी छाप सोडली आहे. 23 वर्षीय मधुशंकाला श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य मानले जात आहे. त्याने 15 एकदिवसीय सामन्यात 31 आणि 11 टी-20 सामन्यात 12 बळी घेतले आहेत. दिलशान मदुशंकाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. 4 कोटी 60 लाख रुपयांसह त्याचा मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला.

Mumbai indians bowlers: मुंबई इंडियन्सचे नवे गोलंदाजी आक्रमण आपण पाहिले आहे का? बूमराह व्यतिरिक्त स्टेन गन सारखे आहेत दोन खेळाडू!

4) गेराल्ड कोएटजी

दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएटजी हा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याला कॉपी करणारा असून त्याने भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीने साऱ्यांनाच प्रभावित केले होते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात अत्यंत धडाकेबाजित केली आहे.

हेडबँड, त्याचा रनअप, वेग, आक्रमकता आणि त्याची सेलिब्रेशनची स्टाईल हे सगळं जबरदस्त आहे. 2023 मध्ये क्रिकेट जबरदस्त कामगिरी केल्यानंतर तो आता निळ्या आणि सोन्याच्या जर्सीत नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here